कुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी भाविकांचा निरुत्साह
By admin | Published: August 29, 2015 09:27 AM2015-08-29T09:27:47+5:302015-08-29T11:00:56+5:30
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला आज पहाटे सुरुवात झाली असली तरी भाविकांमध्ये शाहीस्नानासाठी निरुत्साह दिसून येत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २९ - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला आज पहाटे सुरुवात झाली असली तरी भाविकांमध्ये शाहीस्नानासाठी निरुत्साह दिसून येत आहे. पहिल्या शाहीस्नानासाठी कोट्यावधी भाविकांची अपेक्षा असतानाच राम कुंड व कुशपर्वतावर भाविकांची मोठ्या प्रमाणात अनुपस्थिती दिसून येत आहे.
पहिल्या शाही स्नानानिमित्त कोट्यावधी भाविक हजेरी लातील असे प्राशनातर्फे सांगण्यात येत होते, मात्र काल संध्याकाळपर्यंत तो आकडा २५ लाखांच्या आसपास पोचला. मात्र सकाळी प्रत्यक्षात जेमतेम अडीच लाखाच्या आसापास भाविकांनी स्नानास हजेरी लावली. राम कुंडावर जेमतेम सव्वा लाख तर कुशापर्वतावर दीड लाख भाविकांने स्नान केले अशी माहिती पोलिस निरिक्षक संजय मोहितेंनी दिली. गेल्या कुंभमेळ्यात हा परिसरर गर्दीने अगदी फुलून गेला होता.
आज रक्षा बंधन असल्याने कमी भाविक आले, तसेच गुजरातमध्ये सध्या असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे त्या राज्यातील भाविकांनीही स्नानास हजेरी लावली नाही, अशी अनेक कारणे प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. प्रत्यक्षात मात्र यावेळेस सुरक्षेचा अतिरेक झाल्यानेच भाविकांना नियोजित स्थानापर्यंत पोचण्यास प्रचंड वेळ लागत असल्याने भाविकांनी स्नानासाठी फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. खुद्द नाशिकमधील अनेक भाविकही बाहेर पडण्याऐवजी घरात बसून टीव्हीवरच कुंभमेळ्याच्या व शाहीस्नानाच्या बातम्या पाहत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही प्रशासन व पोलिसांचा अतिरेक झाल्याचे सांगत आयोजनात काही चूका झाल्याचे कबूल केले आहे. तसेच पुढील पर्वण्यांचे फेरनियोजन करू, अशी माहिती त्यांनी दिली.
त्रिकाल भवंतांचा शाही स्नानावर बहिष्कार
स्वतंत्र आखाडा व स्नानाची वेल न दिल्याने नाराज झालेल्या साध्वी त्रिकाल भवंता यांनी शाही स्नानावर बहिष्कार टाकला आहे. यापूर्वीही ध्वजारोहणावेळी साध्वी यांनी गोंधळ माजवला होता.