लोकांच्या उत्साहाने हिंमत वाढवली : अमीर खान, पाणी फाउंडेशनच्या कामांची सोलापुरात पाहणी

By Admin | Published: April 13, 2017 02:26 PM2017-04-13T14:26:07+5:302017-04-13T14:26:07+5:30

.

Due to the enthusiasm of the people, Amir Khan, survey of the water foundation work in Solapur | लोकांच्या उत्साहाने हिंमत वाढवली : अमीर खान, पाणी फाउंडेशनच्या कामांची सोलापुरात पाहणी

लोकांच्या उत्साहाने हिंमत वाढवली : अमीर खान, पाणी फाउंडेशनच्या कामांची सोलापुरात पाहणी

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत सोलापूर
आप्पासाहेब पाटील - सोलापूर
पाणी फाउंडेशनच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या चळवळीत लोकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढत आहे़ लोकांच्या उत्साहपूर्ण कामाने हिंमत वाढवली अशी भावना प्रसिध्द अभिनेते आमीर खान व किरण राव यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले़
आमीर खान सोलापूर दौऱ्यावर येणार याची कुणकुण लागली होती़ या पार्श्वभूमीवर लोकमतने सोलापूर विमानतळावर तळ ठोकला होता़ यावेळी धावपट्टीवरच आमीर खान व किरण राव यांना गाठले़ पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात सुरू केलेल्या चळवळीविषयी त्यांना बोलते केले़ मुंबईहून आमीर खान मल्होत्रा कंपनीच्या हेलिकॉप्टरने आले़ आमीर खान हे काळ्या कलरचा टी-शर्ट, काळी पॅन्ट तर किरण राव या नेव्ही ब्ल्यू ड्रेस, गॉगल व पांढऱ्या कलरची ओढणी घातल्या होत्या़
पुढे बोलताना आमीर खान यांनी राज्यात पाणी फाउंडेशनच्या कामाची माहिती दिली़ राज्यात सुरू असलेल्या कामाबाबत व लोकांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले़ पाणी फाउंडेशनच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी अभिनेता आमीर खान व त्याची पत्नी किरण राव हे सोलापूर दौऱ्यावर आले होते़ सोलापूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले, त्यावेळी त्यांचे स्वागत सोलापूर विमानतळाचे प्रमुख प्रमोद गायकवाड यांनी स्वागत केले़ त्यानंतर थेट आमीर खानने हॉटेल बालाजी सरोवर गाठले़ त्यानंतर त्याठिकाणी थोडी विश्रांती घेऊन ते राळेरास (ता़ बार्शी) याठिकाणच्या कार्यक्रमासाठी पोहोचले़ यावेळी आमीर खान यास पाहण्यासाठी सोलापुरातील चाहत्यांनी हॉटेल बालाजी सरोवरबाहेर गर्दी केली होती़
--------------------------
अन् बॅग विमानतळावरच विसरली़़़़
पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी करण्यासाठी अभिनेता आमीर खान व किरण राव हे सोलापूर विमानतळावर आले़ घाई गडबडीत निघालेल्या आमीर खान यांची बॅग विमानतळावरच विसरली़ याबाबत हेलिकॉप्टरचे पायलट यांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ पायलट यांनी पोलिसांच्या मदतीने ती बॅग हॉटेलवर पोहोचवली़ मात्र या घटनेमुळे सुरक्षारक्षक, पाणी फाउंडेशनच्या टीमची चांगलीच धावपळ उडाली़

Web Title: Due to the enthusiasm of the people, Amir Khan, survey of the water foundation work in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.