सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प.रे. पुन्हा विस्कळीत

By Admin | Published: May 14, 2016 11:29 AM2016-05-14T11:29:44+5:302016-05-14T11:40:48+5:30

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग तिस-या दिवशी विस्कळीत झाली आहे.

Due to the fault of the signal system Disintegrate again | सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प.रे. पुन्हा विस्कळीत

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प.रे. पुन्हा विस्कळीत

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक शनिवारी सलग तिस-या दिवशी विस्कळीत झाली आहे. अंधेरी ते जोगेश्वरी स्थानकादरम्याने ब-याच काळापासून अनेक गाड्या खोळंबल्या असून अप व डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. 
सिग्नल यंत्रणेत नेमका काय बिघाड झाला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोचले असून बिघाड लवकरच दुरूस्त होईल असे समजते. सलग तिस-या दिवशी झालेल्या रेल्वे खोळंब्यामुळे प्रवासी मात्र संतप्त झाले असून स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. अनेक प्रवाशांनी गाड्यांमधून उतरून ट्रॅकमधून चालत जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. 
 

 

Web Title: Due to the fault of the signal system Disintegrate again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.