भीतीने साखर निर्यातीवर कर
By admin | Published: June 21, 2016 03:50 AM2016-06-21T03:50:51+5:302016-06-21T03:50:51+5:30
साखरेचे दर ५० रुपयांच्या पुढे जातील, या भीतीपोटी केंद्र सरकारने निर्यातीवर २० टक्के कर लावला आहे. मध्यंतरी निर्यात अनुदान बंद केले त्यानंतर निर्यात कराच्या रूपाने केंद्राने
कोल्हापूर : साखरेचे दर ५० रुपयांच्या पुढे जातील, या भीतीपोटी केंद्र सरकारने निर्यातीवर २० टक्के कर लावला आहे. मध्यंतरी निर्यात अनुदान बंद केले त्यानंतर निर्यात कराच्या रूपाने केंद्राने कारखानदारांना दुसरा झटका दिल्याने साखर उद्योगासमोरील अडचणी वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
साखरेचे दर पडल्याने केंद्र सरकारने हंंगाम सुरू असताना प्रत्येक कारखान्याला एकूण उत्पन्नाच्या १२ टक्के साखर निर्यात करण्याची सक्ती केली. निर्यात न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई
करण्याचा इशारा देत निर्यात करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिटन ४५ रुपये दिले. त्यानुसार राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी आपल्या कोट्याची साखर निर्यात केली आहे.
हंगामात बऱ्यापैकी साखर निर्यात झाल्याने आता निर्यातीसाठी फारशी साखर नाही तरीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपये दर आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत २-३ लाख टन साखर निर्यात होऊ शकली असती.
त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होऊन साखरेला चांगला दर मिळाला असता. आता किरकोळ बाजारात ३६ रुपये प्रतिकिलोवर साखर स्थिर आहे. निर्यात रोखली नसती तर फार तर
हा दर ४० रुपयांपर्यंत गेला असता. परंतु रमजान महिना सुरू आहे, डाळीबरोबर साखरेचे दर वाढले तर सरकारसमोरील अडचणी वाढतील, या भीतीपोटीच २० टक्के
निर्यात कर लावण्याचा निर्णय घेतल्याचे साखर तज्ज्ञांचे मत आहे. (प्रतिनिधी)