पुरामुळे बांधासह भातशेती गेली वाहून

By Admin | Published: August 4, 2016 02:34 AM2016-08-04T02:34:03+5:302016-08-04T02:34:03+5:30

पावसाचा जोर कायम असून गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे़

Due to flooding the paddy cultivation has been lost | पुरामुळे बांधासह भातशेती गेली वाहून

पुरामुळे बांधासह भातशेती गेली वाहून

googlenewsNext


विक्रमगड : पावसाचा जोर कायम असून गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे़ अतिवृष्टीमुळे भातशेती धोक्यात आली असून विक्रमगड तालुक्यासह खुडेद, बोरसेपाडा, कुंडाचापाडा, महालेपाडा आदी भागांतील शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत़ तर अनेकांची भातशेती पाण्याखाली व जास्त पावसामुळे लागवडीखाली भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत़.
अनेक भागात भातरोपे कुजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. खांड खरपडपाडा रस्त्यांची मोरी(पुल)तुटल्याने जवळजवळ ३०० लोकसंख्या असलेल्या या गावाला जाण्याचा मार्गच उरलेला नाही़ तसेच आंबेघर पुलाचे बांधकाम नवीन असतांनाही पुलाच्या सुरुवातीला व शेवटी असलेला रस्ता पाण्याबरोबर पाहून गेला आहे़ याबाबत खुडेद येथील ग्रामस्थांनी व खांड-खरपडपाडा ग्रामस्थांनी तत्काळ नुकसानभरपाई व दुरुस्तीकामी अर्ज सादर केला असल्याची प्रत पत्रकांना दिली आहे़
यंदा जूनच्या पंधरवड्यापासूनच सर्वत्र पावसाची दमदार सुरुवात झाली आहे़ त्यानुसार शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता भातशेतीची कामे हाती घेतली. पावसाचे प्रमाण चांगले असल्याने भातरोपेही चांगल्या प्रकारे झाली. मात्र, सततच्या या पावसाने काही दिवस उघडीप न घेतल्याने भातांच्या खाचरात पाणी साठून या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने भातरोपे कुजण्याचे प्रकार सुरु झाले आहेत़ (वार्ताहर)
>खांड-खरपडा रस्त्यामध्ये असलेली मोरी पावसाचे अतिवृष्टीने वाहून गेल्याने गावातील ३०० लोकांचा संपर्क तुटलेला आहे़ त्यांना रहदारीसाठी दुसरा मार्ग नाही यावर त्वरित उपाययोजना करण्याकामी मी अर्ज सादर केलला आहे़
- विजय खुताडे, माजी सरपंच, आेंंद.
>मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये नदीसारखे पाणी वाहत होते. त्यामध्ये आमचे गावपाड्यातील शेतीची बांधबंधिस्ती वाहून गेल्याने आमचे मोठे नुकसान झालेले आहे़
- विष्णू नवसू चौधरी, खुडेद.

Web Title: Due to flooding the paddy cultivation has been lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.