गडकरींच्या ताकीदमुळे जिल्ह्यातील चार जलमार्गांचा अखरे मार्ग सुकर
By सुरेश लोखंडे | Published: January 12, 2018 08:11 PM2018-01-12T20:11:05+5:302018-01-12T20:14:06+5:30
यासाठी आधीच ‘ठाणे जिल्ह्यास जलमार्गांची प्रतीक्षा’या आशयाचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून प्रशासनाला नूतन वर्षातील संकल्पाची जाणीव करून दिली होती. त्यास आता केंद्राचे पाठबळ मिळाल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे.
लोकमत इंम्पॅक्ट !
सुरेश लोखंडे
ठाणे : जलमार्गांचा विकास करण्याची ताकीद देऊन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील प्रमुख चार जलमार्गांसह ठिकठिकाणच्या जलवाहतुकीचा मार्ग सुकर केला आहे. यासाठी आधीच ‘ठाणे जिल्ह्यास जलमार्गांची प्रतीक्षा’या आशयाचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून प्रशासनाला नूतन वर्षातील संकल्पाची जाणीव करून दिली होती. त्यास आता केंद्राचे पाठबळ मिळाल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. गडकरी यांनी दिलेल्या ताकीदमुळे जिल्हा यंत्रणा कामाला लागली आहे.
राष्ट्रीय महामार्गांसह राज्य व मुख्य जिल्हामार्गांसह लोहमार्गांतील सततच्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांसह ठाणेकर रोज मरणयातना भोगत आहेत. त्यात ध्वनी व वायुप्रदूषणामुळे दैनंदिन जीवन मेटाकुटीला आले आहे. या-ना-त्या कारणांमुळे होणारी सततची वाहतूककोंडी आणि प्रदूषणातून मुक्तता करणारे ठाणे जिल्ह्यातील जलमार्ग गांभीर्याने मार्गी लावणे लोकहिताचे असल्याचे लोकमतने प्रशासनाच्या निदर्शनास सातत्याने आणून दिले आहेत. यामुळे लोहमार्गांवरील ताण कमी करणे शक्य होणार असून राष्ट्रीय महामार्गांप्रमाणेच ६३८ किमीच्या राज्यमार्ग व मुख्य जिल्हामार्गांवरील कोंडीदेखील जलमार्गामुळे कमी करणे शक्य होणार आहे. यासाठी प्रस्तावित सुमारे तीन हजार २५३ कोंटी खर्चाचे जलमार्ग मार्गी लावणे गरजेचे आहे.
सर्वच महानगरांना लागलेले स्मार्ट सिटीचे वेध यामुळे जिल्ह्यातील महापालिकांकडे देशभरातील महानगरांच्या दळणवळणात सातत्याने वाढ होत आहे. या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसह नवी मुंबई महापालिका-एमएमआरडीए भलेमोठे दोन हजार ८०० कोटींचे दोन ब्रॉड जलमार्ग यातील पहिल्या टप्प्यातील वाशी ते ऐरोलीदरम्यानचा १२ किमी लांबीच्या जलमार्गास, त्यासाठी सुमारे दोन हजार ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय, वाशीगाव येथून खाडीकिनाºयावरून कोपरखैरणे-घणसोली-गोठिवली-रबाळे-ऐरोली व दिघा हा जलमार्ग उपनगरांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. वाशी ते ऐरोली व वाशी ते बेलापूरदरम्यानचा मार्गही त्वरित हाती घेण्याची गरज आहे.
ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसाठी ४५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे २८७ कोटी खर्च होणार आहेत. यामध्ये इंद्रासिटी रूट ते घोडबंदर रोड, कोलशेत, साकेत, दिवा हा जलमार्ग आहे. याशिवाय, ठाणे ते वसई, मीरा-भार्इंदर जलमार्ग, ठाणे ते भिवंडी, ठाणे ते डोंबिवली, कल्याण आदी चार जलमार्ग ठाणे मनपाने गांभीर्याने पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.