जळगावातील ‘नेकी की दिवार’ मुळे ७ हजारावर गरजूंना मिळाले कपडे

By admin | Published: June 4, 2017 02:31 PM2017-06-04T14:31:42+5:302017-06-04T14:31:42+5:30

संत गाडगेबाबा महाराज यांच्या भुकेल्यांना अन्न, बेघरांना घर या उक्तीप्रमाणे गोर-गरीबांना कपडे मिळावे, यासाठी माजी नगरसेवक अरुण शिरसाळे यांनी

Due to 'good fortune' of Jalgaon, 7 thousand people got clothes for the needy | जळगावातील ‘नेकी की दिवार’ मुळे ७ हजारावर गरजूंना मिळाले कपडे

जळगावातील ‘नेकी की दिवार’ मुळे ७ हजारावर गरजूंना मिळाले कपडे

Next

किशोर पाटील/ऑनलाइन लोकमत 
जळगाव, दि. 4 -  संत गाडगेबाबा महाराज यांच्या भुकेल्यांना अन्न, बेघरांना घर या उक्तीप्रमाणे गोर-गरीबांना कपडे मिळावे, यासाठी माजी नगरसेवक अरुण शिरसाळे यांनी बी़ज़े मार्केटजवळील पोलीस चौकीजवळ ‘नेकी की दिवार’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातंर्गत गेल्या सहा महिन्यात सात हजारावर गरजूंना कपडे मिळाले आहेत़ ऊन, थंडी व पाऊस या गोष्टींपासून बचावासाठी अंगावर कपडे नसलेले गोर-गरीब चिमुकले, पुरूष असे विदारक चित्र माजी नगरसेवक अरूण शिरसाळे यांनी बघितले़ अशा गरजूंसाठी कपडे मिळावेत, यासाठी ‘नेकी की दिवार’ ही संकल्पना शिरसाळे यांना सुचली. अनेकांकडे जुने कपडे असतात, त्याच उपयोग केला जात नाही... असे सर्व कपडे एका ठिकाणी जमवून त्याचा गोरगरीबांना प्रत्यक्ष लाभ व्हावा, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. रॅक, दोरीवर नियमित कपडे-कपडेच ८ डिसेंबर २०१६ रोजी ‘ नेकी की दिवार’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला़ सुरवातीपासून या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला़ अनेक महिला, पुरूष स्वत:चे घरातील लहान मुलांचे जुने कपडे याठिकाणी ठेवून जातात़ गोर-गरीब गरजू, निराधार मुले, पुरूष तसेच महिला या ठिकाणी हक्काच्या घराप्रमाणे येतात व पाहिजे तेवढे कपडे घेवून जातात़ दुकानातून नवीन कपडे घेतल्याप्रमाणेच गरजूंचा नेकी की दिवार येथून कपडे उचलताना आनंद असतो़ सहा महिन्यात एकही दिवस असा गेला नाही की याठिकाणी कपडे नाहीत. शहरातील प्रत्येक गरीब तसेच नागरिकापर्यंत नेकी की दिवार पोहचली आहे़ आता नागरिक पादत्रानेही आणून देऊ लागले आहेत. कोट गरजूंच्या चेहऱ्यावरील आनंद हेच समाधान नेकी की दिवार वर अनेक जण कपडे ठेवताना दिसतात़ काही वेळाने गरजू हे कपडे घेवून जातात़ त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आपले समाधान आहे़ भविष्यात गरीबांसाठी आणखी काय करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे़ आणखी इतर ठिकाणीही नेकी दिवार हा उपक्रम सुरू करण्याबाबत विचार आहे़. म्हणजे प्रत्येक गरजूला कपडे मिळू शकतील़ - अरूण शिरसाळे, माजी नगरसेवक, जळगाव

Web Title: Due to 'good fortune' of Jalgaon, 7 thousand people got clothes for the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.