‘घोटाळ्यांवरून सरकारची कोंडी’

By admin | Published: July 19, 2015 01:43 AM2015-07-19T01:43:45+5:302015-07-19T01:43:45+5:30

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी पहिल्या आठवड्यात लावून धरणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आता विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात

'Due to government scandal over scams' | ‘घोटाळ्यांवरून सरकारची कोंडी’

‘घोटाळ्यांवरून सरकारची कोंडी’

Next

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी पहिल्या आठवड्यात लावून धरणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आता विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्र्यांच्या घोटाळ्यांवरून सरकारची कोंडी करणार आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी विधानसभेत मांडतील. कर्जमाफीची मागणी ते मान्य करणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट आहे. कर्जमाफीवरच अडून बसल्यास मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यातील कायदा सुव्यवस्था या मुद्यांवरून सरकारची कोंडी करण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते.(विशेष प्रतिनिधी)
चिक्की प्रकरण, मंत्र्यांची बोगस डिग्री, वाढती गुन्हेगारी, मुंबईतील दारुकांड हे मुद्दे पुढील आठड्यात विरोधकांच्या अजेंड्यावर असतील.

Web Title: 'Due to government scandal over scams'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.