जीएसटीविरोधात १५ जून रोजी संप
By Admin | Published: June 10, 2017 02:57 AM2017-06-10T02:57:38+5:302017-06-10T02:57:38+5:30
वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) जीवनावश्यक खाद्यान्न वगळावेत या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील व्यापाऱ्यांनी १५ जून रोजी लाक्षणिक संप पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) जीवनावश्यक खाद्यान्न वगळावेत या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील व्यापाऱ्यांनी १५ जून रोजी लाक्षणिक संप पुकारला आहे.
जीवनावश्यक खाद्यपदार्थांवरील कर आकारणी आणि कायद्यातील जाचक अटींना व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडेदेखील मागणीचे निवेदन दिले आहे. त्यानंतरही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने जीएसटीबाबत भूमिका ठरविण्यासाठी गुलटेकडी येथील दी पूना मर्चंट्स चेंबरच्या सभागृहात राज्यव्यापी परिषद बोलावण्यात आली होती. त्यात राज्यभरातील चारशे व्यापारी प्रतिनिधी सहभागी झाले होते.
जीएसटीतून ब्रँडेड शेतमाल वगळावा, व्यवसायकर व बाजार समिती कर रद्द करावा, करदात्यांना कायद्यातील तरतुदींची माहिती होण्यासाठी अवधी द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.