कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती

By admin | Published: July 12, 2016 04:59 PM2016-07-12T16:59:02+5:302016-07-12T16:59:02+5:30

कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, पाणी सांडव्यावरून वाहू लागले आहे.

Due to heavy rain in Kolhapur flooding | कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती

कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती

Next

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 12-  कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, पाणी सांडव्यावरून वाहू लागले आहे.  गेले पाच दिवस पाऊस सैराट झाल्याने कळंबा तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन आज मंगळवारी सकाळी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. तलावाला मिसळणारे कात्यायनी डोंगरातील ओढे-नाले ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्यामुळे तलावाच्या पाण्यात झपाट्याने वाढ झाली.
१९७२ नंतर यंदा पहिल्यांदाच हा तलाव आटल्याने पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले होते. १९७२ नंतर तब्बल ४४ वर्षांनी संपूर्ण कळंबा तलाव कोरडा पडला होता. कोल्हापुरात पावसाची संततधार कायम असून, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.

Web Title: Due to heavy rain in Kolhapur flooding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.