अतिवृष्टीमुळे माळशेज घाटाकडे जाणारा रस्ता खचला, वाहतूक ठप्प

By Admin | Published: July 15, 2017 01:41 PM2017-07-15T13:41:50+5:302017-07-15T13:45:45+5:30

माळशेज घाटाकडे जाणार रस्ता खचल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Due to heavy rain, road going towards Malsege Ghat collapsed, traffic jam | अतिवृष्टीमुळे माळशेज घाटाकडे जाणारा रस्ता खचला, वाहतूक ठप्प

अतिवृष्टीमुळे माळशेज घाटाकडे जाणारा रस्ता खचला, वाहतूक ठप्प

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 15 - माळशेज घाटाकडे जाणार रस्ता खचल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  मुरबाडहून नगर/जुन्नर आेतूरहून माळशेजकडे जाणारा रस्ता खचला आहे. 
 
रस्ता खचल्यानं माळशेज परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शिवाय, माळशेज घाटातील वाहतूक बंद असल्याने पुढील 2 ते 3 दिवस चाकण-तळेगाव मार्गावरील रहदारी वाढणार असल्यानं तळेगांव दाभाडे वाहतूक पोलिसांच्याही जबाबदारीत भर पडणार आहे.  
 
माळशेज घाटातील डोंगरकड्यांवरुन पाण्याचे प्रवाह गतीनं वाहणे सुरू झाले आहे. अशावेळी दरडी कोसळण्याची शक्यता असते. शुक्रवारी (14 जुलै ) रात्री राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांशी प्रांत अधिकारी प्रसाद उकार्डे यांनी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने दोन दिवसांसाठी या घाटावरील दोन्ही बाजूनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. रविवारीदेखील पर्यटक तसेच सर्व वाहनांसाठी घाट बंद राहणार आहे.
 
आणखी बातम्या वाचा
(भुशी धरण ओव्हर फ्लो, पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव)
(मुंबईकरांसाठी खूशखबर ! मोडक सागर धरण ओव्हरफ्लो)
(डेंग्यू, मलेरियाला "या" माशांमुळे बसणार आळा)
 
दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद
दरम्यान, ही घटना घडण्यापूर्वीच माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी पर्यटकांना माळशेज घाटात न जाण्याचं आवाहन करण्यात आले होते. यामुळे पर्यटकांसाठी माळशेज घाट दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे. शनिवारी व रविवारी घाटात सहलीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे. 
 
सध्या परिसरात दरडींचा अंदाज घेणे सुरू आहे. दरम्यान वाहतुकीवर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून माळशेज घाटात सतत दरडी कोसळण्याचा धोका जाणवत असल्यानं पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येते 
 
माळशेज घाट हे मुसळधार पावसाचे आगार मानले जाते. माळशेज घाट आणि परिसरात दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतो. मागील वर्षी २०१६ मध्ये जुलै महिन्यात माळशेज घाटात ४ ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, करंजाळे गावच्या हद्दीत एक डोंगरकडा कोसळला होता, तर ऑगस्ट महिन्यात करंजाळे गावाजवळ नगर- कल्याण महामार्गावर डांबरी रस्ता खचला होता.
 
दरडी आणि डोंगरकडे कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने मोठा अपघात किंवा मोठी दुर्घटना झाली नव्हती, मात्र या काळात घाटातून वाहतूक करण्यास मोठा अडथळा निर्माण झाल्याने माळशेज मार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.
सन २०१६ पासून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने माळशेज घाटात घाटदुरुस्तीचे काम सुरू आहे. यापूर्वी घाटात अनेक ठिकाणी धोकादायक दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची मोठी शक्यता आहे अशा ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.
 

Web Title: Due to heavy rain, road going towards Malsege Ghat collapsed, traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.