पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती, वाहून गेलेल्या 5 जणांपैकी तिघांचे सापडले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 02:19 PM2017-08-30T14:19:03+5:302017-08-30T14:26:56+5:30

पालघर जिल्ह्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पुरामध्ये वाहून गेलेल्या 5 जणांपैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत.  

 Due to heavy rainfall in Palghar due to heavy rainfall, three bodies were found in the flood situation. | पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती, वाहून गेलेल्या 5 जणांपैकी तिघांचे सापडले मृतदेह

पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती, वाहून गेलेल्या 5 जणांपैकी तिघांचे सापडले मृतदेह

Next

पालघर, दि. 30 - पालघर जिल्ह्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पुरामध्ये वाहून गेलेल्या 5 जणांपैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत.  
मृत व्यक्तींचं नावं 
1. तनिष्का राम बालशी (वय 5 वर्ष), पालघर
2. नैना  गहला (वय 50 वर्ष)  
3. राजेश नायर, बोईसर
तनिष्का राम बालशी ही पाच वर्षांची मुलगी पालघरमीधल वेवूर येथील रहिवासी होती. नैना गहला (50 वर्ष) या डहाणूतील आंबेसरी येथील रहिवासी होत्या. तर राजेश नायर हे बोईसर येथील राहणारे होते. 

बेपत्ता व्यक्तींची नावं
1. सुरोत्तम झा ( वय 25 वर्ष, नवली पालघर)
2. नरु वळवी ( वय 45 वर्ष,  डहाणू) 

विक्रोळीत इमारत कोसळून एकाचा तर दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू
दरम्यान, मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला असून विक्रोळीत इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीच्या वर्षानगर भागातील ही इमारत आहे. दोन मजली इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे विक्रोळीत दरडही कोसळली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीमधील सूर्यानगर येथे ही दरड कोसळली आहे .  दरम्यान, आज बुधवारीही (30 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. अनेक सखल भागात अद्यापही पाणी तुंबलेले आहे. जेथे अशी धोकादायक ठिकाणे आहेत, तेथे एनडीआरएफचे जवान लोकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

घराबाहेर न पडण्याचं आवाहन

येत्या २४ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मच्छीमार बांधवांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मंत्रालय, नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. एकंदरीतच मंगळवारी मुंबईकरांना झोडपून काढलेला पाऊस बुधवारीही मुंबईकरांना धडकीच भरविणार असल्याचे चित्र असून नेहमी धावणारी मुंबई संथगतीने सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मुंबई आता हळूहळू पुर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांना घरी पोहोचताच आलं नाही. पाऊस रौद्र रुप धारण करत असल्याचं लक्षात येताच अनेकांनी ऑफिसमधून लवकर घरी जाणं पसंद केलं. मात्र पाऊस इतका मुसळधार सुरु होता की, स्टेशनला पोहोचल्यानंतर रेल्वे ठप्प असल्याने तिथेच रात्र घालवावी लागली. या पावसामध्ये मुंबईकरांचं पोट भरणारे डबेवालेही अडकून पडले होते. दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून धावणा-या मुंबईकराचं पोट भरण्याचं काम करणा-या डबेवाल्यांना संपुर्ण रात्र लोकल ट्रेनमध्येच घालवावी लागली. त्यामुळे आज डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे.

Web Title:  Due to heavy rainfall in Palghar due to heavy rainfall, three bodies were found in the flood situation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.