वडील रागावल्याने मुलाने जाळली वाहने

By admin | Published: September 19, 2016 03:34 PM2016-09-19T15:34:36+5:302016-09-19T15:37:32+5:30

कामधंदा न करता रिकामटेकडा का फिरतोस अशी विचारणा करीत वडील रागावल्यामुळे चिडलेल्या तरुणाने दुस-यांची वाहने पेटवली.

Due to his father's anger, his son got burnt | वडील रागावल्याने मुलाने जाळली वाहने

वडील रागावल्याने मुलाने जाळली वाहने

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ -  कामधंदा न करता रिकामटेकडा का फिरतोस अशी विचारणा करीत वडील रागावल्यामुळे चिडलेल्या तरुणाने स्वत:च्या दुचाकीसह परिसरातील वाहने जाळून त्यांची तोडफोड केली. ही घटना रविवारी पहाटे जनवाडी येथे घडली असून चतु:श्रुंगी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
धिरज शंकर कटीकर (वय २२, रा. सुरेश मंडप शेजारी, जनवाडी) असे अटक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी किसनसिंग शंकर रजपुत (वय २८, रा. आराधना मित्रमंडळाजवळ, जनवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कटीकर रिक्षाचालक आहेत. कुटुंबाचे उत्पन्न तुटपुंजे असल्यामुळे त्यांनी मुलगा धिरज याला नोकरी शोधायला सांगितले होते. परंतु, तो कामधंदा न करता दिवसभर रिकामटेकडेपणाने फिरत असल्यामुळे वडील त्याच्यावर रागावले. चिडलेल्या मन:स्थितीत घराबाहेर पडलेल्या धिरज रविवारी पहाटे पुन्हा घरी आला. 
बराच वेळ दार वाजवूनही वडीलांनी दार उघडलेच नाही. त्यामुळे रागाच्या भरात धिरजने लाकडी स्टम्पने स्वत:च्याच दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर एका बाटलीमध्ये गाडीतील पेट्रोल काढले. जनवाडीतील नागरीक किशनसिंग रजपुत व रोहित राजेंद्र मोतलिंग यांच्या दुचाकी आणि दस्तगिर अब्दुल सय्यद यांच्या रिक्षावर पेट्रोल ओतले. या वाहनांना त्याने आग लावली. एवढ्यावरच न थांबता या माथेफिरुने नरसिंह दैलतराव महिंद्रकर यांची रिक्षा, फरीद जब्बार मनियार यांच्या मोटारीची दांडक्याने तोडफोड केली. वाहनांनी पेट घेतल्यामुळे परिसरातील नागरिक तातडीने बाहेर आले. पाण्याचा मारा करुन त्यांनी आग विझवली. पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आल्यावर चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी धावले. नागरिकांनी धिरजवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक व्ही. एम कोटी यांनी दिली.

Web Title: Due to his father's anger, his son got burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.