प्राप्तिकराच्या तपासणीमुळे अनेकांचे दणाणले धाबे
By admin | Published: December 28, 2016 08:44 PM2016-12-28T20:44:28+5:302016-12-28T20:44:28+5:30
माजलगाव शहरात मंगळवारी दुगड बंधूकडे प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या तपासण्या दुसऱ्या दिवशी बुधवारीही सुरूच होत्या.
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 28 - माजलगाव शहरात मंगळवारी दुगड बंधूकडे प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या तपासण्या दुसऱ्या दिवशी बुधवारीही सुरूच होत्या. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दुगड बंधू व त्यांच्या सर्व नोकराच्या खात्याचा तपशीलवार माहिती घेतली असून, काही अधिकाऱ्यांनी शहरातील बडे व्यापारी धनराज बंब यांच्या वेगवेगळ्या फर्मची तपासणी सुरू केली.
राञी उशिरापर्यंत या तपासण्या सुरू होत्या. तर शहरातील नामांकित बड्या डॉक्टरा कडे ही आयकार विभागाने आपला मोर्चा वळविला असून याचा तपसिल मिळू शकला नाही, तर हाती आलेल्या अधिकृत सूत्राच्या माहितीनुसार शहरातील बड्या करबुडव्यांचे बँकेतील खाते सिल करण्यात आले असल्याचे कळते.
माञ प्राप्तिकर विभागाकडून यास दुजोरा मिळू शकला नाही. प्राप्तिकर अधिकारी शहरात तळ ठोकून असल्याने अनेक करचुकव्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली असून, हे अधिकारी अवाढव्य व्यवहार असलेले व ट्रेस झालेल्या अनेकांच्या खात्याच्या तपासण्या करत आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.