डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या खर्चात वाढ

By admin | Published: July 20, 2015 01:34 AM2015-07-20T01:34:12+5:302015-07-20T01:34:12+5:30

एसटी महामंडळ सध्या वाढीव खर्चाचा डोंगर सहन करत असून यात सर्वात मोठ्या अशा डिझेल दरवाढीच्या खर्चाचा समावेश आहे. एसटी महामंडळाने मागील

Due to increase in diesel price increase, ST's cost increases | डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या खर्चात वाढ

डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या खर्चात वाढ

Next

मुंबई : एसटी महामंडळ सध्या वाढीव खर्चाचा डोंगर सहन करत असून यात सर्वात मोठ्या अशा डिझेल दरवाढीच्या खर्चाचा समावेश आहे. एसटी महामंडळाने मागील आर्थिक वर्षात (२0१४-१५) डिझेलवर तब्बल २ हजार ६00 कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. या खर्चात त्याआधीच्या आर्थिक वर्षाशी (२0१३-१४) तुलना केली असता १८२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
एसटी महामंडळाकडे सध्या १८ हजार बसेस असून या डिझेलवर धावणाऱ्या आहेत. या बसमधून एसटी महामंडळ जवळपास दर दिवशी लाखो प्रवाशांची वाहतुक करते. अशा या एसटी महामंडळाला डिझेलचा मोठा खर्च सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाला गर्दीच्या काळात साधारणत: १३ लाख ५० हजार लिटर डिझेल प्रत्येक दिवशी लागते. तर इतर दिवशी हेच डिझेल दिवसाला ११ लाख लिटर एवढे लागते. हे पाहता जवळपास वर्षाला ४0 ते ४१ कोटी लिटर डिझेल एसटी महामंडळाला लागत आहे. मात्र या डिझेलच्या दरात गेल्या आर्थिक वर्षात वाढ होत असल्याने मोठ्या खर्चाला महामंडळाला सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. मे २0१४ मध्ये डिझेलच्या दरात १ रुपये ९ पैसे वाढ झाली. मे महिन्यानंतर डिझेलच्या दरात त्वरीत दोन वेळा ५0 पैशांची वाढ झाली आणि त्यात सतत चढ-उतार होत गेले. मात्र यामुळे महामंडळाला डिझेलच्या खर्चाचा ताळमेळ व्यवस्थित राखता आला नाही.

Web Title: Due to increase in diesel price increase, ST's cost increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.