स्वतंत्र विदर्भासाठी दिल्लीत 24ला धरणे
By admin | Published: July 23, 2014 02:41 AM2014-07-23T02:41:31+5:302014-07-23T02:41:31+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे 24 जुलै रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने धरणो देण्यात येणार आहेत.
Next
नवी दिल्ली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे 24 जुलै रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने धरणो देण्यात येणार आहेत. तर त्याचवेळी विदर्भातील 100 शेतकरी राष्ट्रपतींना भेटून त्यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागणार असल्याची माहिती समिती व नवराज्य निर्माण महासंघाने दिली.
अॅड. वामनराव चटप, राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, श्रीनिवास खांदेवाले व महासंघाचे अध्यक्ष बाबा रामकिशनदेव तोमर, सरचिटणीस प्रवीण महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, विदर्भस्तरावर अनेक आंदोलने केल्यावरही सरकार लोकांच्या भावनेशी खेळत आहे. 1क्9 वर्षे जुनी असलेली ही मागणी पूर्ण करायला सरकार तयार नाही. अजूनही शेतक:यांच्या आत्महत्या होत असताना विदर्भाचा मुद्दा राष्ट्रीय होत नाही याबाबत खेद व्यक्त करून चक्रवर्ती म्हणाले, विदर्भातील शेतक:यांची स्थिती नाजूक बनली आहे. सावका:यांच्या कचाटय़ातून शेतकरी सुटलेला नाही. त्यामुळे शेतक:यांनी इच्छामरणाची मागणी केली आहे. (विशेष प्रतिनिधी)