कार्तिकी एकादशीमुळे एसटीच्या भाडेवाढीचे चार दिवस कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:15 AM2018-11-01T05:15:47+5:302018-11-01T06:57:35+5:30

१ ते १६ नोव्हेंबरपर्यंतच राहणार हंगामी भाडेवाढ

Due to Kartika Ekadashi, ST's fare hike would be four days less | कार्तिकी एकादशीमुळे एसटीच्या भाडेवाढीचे चार दिवस कमी

कार्तिकी एकादशीमुळे एसटीच्या भाडेवाढीचे चार दिवस कमी

Next

मुंबई : राज्यातील सुमारे ६७ लाख एसटी प्रवाशांना कार्तिकी एकादशीमुळे एसटी तिकीट दरात काहीसा दिलासा मिळेल. कार्तिकी एकादशीनिमित्ताने पंढरपूर येथे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता एसटीची हंगामी दरवाढ १ ते १६ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारकऱ्यांसह भाविक मोठ्या संख्येने जमा होतात.

१९ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी १७ ते २३ नोव्हेंबर या काळात राज्यातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर येथे दरवर्षी येतात. यामुळे दिवाळीनिमित्त केलेली १० टक्के हंगामी दरवाढ ही १ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे आदेश महामंडळाच्या वाहतूक विभागाने दिले. हंगामी दरवाढीचा कालावधी १ ते २० नोव्हेंबरऐवजी १ ते १६ नोव्हेंबर असा असेल. याबाबत राज्यातील सर्व आगार-स्थानकांना याबाबत सूचना केल्याचे महामंडळाने सांगितले.

विभागीय पातळीवर उपोषण स्थगित
८ व ९ जून रोजी अघोषित कामबंद आंदोलनामध्ये सहभाग घेतलेल्या कर्मचाºयांवरील कारवाईबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. या आणि अशा इतर मागण्यांवर एसटी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. महामंडळाने आकसपूर्वक घेतलेले परिपत्रक रद्द करण्याचे मान्य केल्याने गुरुवार, १ नोव्हेंबरपासून विभागीय पातळीवरील उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना (मान्यताप्राप्त)

Web Title: Due to Kartika Ekadashi, ST's fare hike would be four days less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.