मानधन न मिळाल्याने अनोखे आंदोलन पोते घालून शिजविला पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 08:38 PM2016-08-25T20:38:34+5:302016-08-25T20:38:34+5:30
शालेय पोषण आहार शिजविण्याचा मोबदला म्हणून मिळणारे मानधन पाच महिन्यांपासून रखडल्याने येथील शालेय पोषण आहार शिजविणाऱ्याने आंदोलन
बुलडाणा, दि. 25 : शालेय पोषण आहार शिजविण्याचा मोबदला म्हणून मिळणारे मानधन पाच महिन्यांपासून रखडल्याने येथील शालेय पोषण आहार शिजविणाऱ्याने आंदोलन म्हणून पोते परिधान करुन गुरुवारी पोषण आहार शिजविला. शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या शासनाकडून २५ विद्यार्थ्यांपर्यंत दरमहा १ हजार रुपये तर २६ ते २०० पर्यंत विद्यार्थी संख्या असल्यास दोघांना प्रतिमाह २ हजार रुपये मानधन देण्यात येते. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून सदर मानधन रखडले आहे. यामुळे आर्थिंक चणचणीचा सामना पोषण आहार शिजविणाऱ्यांना करावा लागत आहे. सदर मानधन मिळावे, यासाठी गुरुवारी पोषण आहार शिजविणाऱ्यांच्या संघटनेचे येथील तालुकाध्यक्ष कृष्णा मोरे यांनी गुरुवारी ह्यपोतेह्ण परिधान करुन पोषण आहार शिजवून आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले. सदर आंदोलनाची दखल न घेता थकीत असलेले मानधन त्वरित न दिल्यास तालुकाभर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.