संख्याबळ नसल्यामुळं पंतप्रधानपदानं हुलकावणी दिली - शरद पवारांची स्पष्टोक्ती

By admin | Published: December 24, 2015 01:05 PM2015-12-24T13:05:30+5:302015-12-24T15:00:41+5:30

संख्याबऴ नसल्यामुळे पंतप्रधान झालो नाही, असं लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिलखुलासपणे सांगत शरद पवारांनी लोकशाहीत संख्याबळाचा आदर करायला हवा याचा वस्तुपाठ राजकीय नेत्यांसमोर आखून दिला.

Due to lack of power, the Prime Minister gave a call - Sharad Pawar's clarion | संख्याबळ नसल्यामुळं पंतप्रधानपदानं हुलकावणी दिली - शरद पवारांची स्पष्टोक्ती

संख्याबळ नसल्यामुळं पंतप्रधानपदानं हुलकावणी दिली - शरद पवारांची स्पष्टोक्ती

Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २४ - संख्याबऴ नसल्यामुळे पंतप्रधान झालो नाही, असं लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिलखुलासपणे सांगत शरद पवारांनी लोकशाहीत संख्याबळाचा आदर करायला हवा याचा वस्तुपाठ राजकीय नेत्यांसमोर आखून दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख असलेल्या शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोकमततर्फे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात शरद पवार यांनी लोकमतच्या संपादकांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी तुम्ही पंतप्रधान का झाला नाहीत यावर बोलताना पवार यांनी जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा दाखला दिला. नेहरूंच्या मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत यांच्यासारखे पंतप्रधानपदाला लायक उमेदवार होते असे सांगितले. परंतु  संख्याबळ महत्त्वाचे असते असे पवारांनी अधोरेखीत केले.  भारताच्या राजकारणातील अनेक महत्वाच्या घटना, स्थित्यंतरे यांचे साक्षीदार राहिलेल्या पवारांच्या या वार्तालापाच्यावोळी लोकमत मीडियाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा व चेअरमन विजय दर्डा, समूह संपादक दिनकर रायकर तसेच पुण्यातील सर्व पद्म पुरस्कार विजेते व अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
शरद पवारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणा-या स्लाईडशोसाठी इथे क्लिक करा. 
 
लोकमतच्या संपादकांशी मनमोकळा संवाद साधताना शरद पवार यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली. राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून माझ्या कार्याला प्रेरणा मिळाली असे त्यांनी नमूद केले. सर्वसामान्य भारतीयांच्या राजकीय सूज्ञपणामुळेच भारतातील लोकशाही बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा सध्या बराच गाजत असून राज्यात त्याचे अनेक पडसाद उमटले आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेने या मुद्यावरून अांदोलनही केले. याबाबत शरद पवारांना त्यांचे मत विचारले असता छोट्या राज्यांना पर्याय नसल्याचे सांगत स्वतंत्र विदर्भाचा निर्णय हा राजकीय नव्हे तर जनतेचा असल्याचे सांगितले. स्वतंत्र विदर्भ हवा की नको हा निर्णय विदर्भवासियांनी घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.
डीडीसीए गैरव्यवहाराच्या आरोपांवरून अडचणी सापडलेले अर्थमंत्री अरूण जेटली यांना पवार यांनी क्लीनचिट दिली. जेटलींच्या सहका-यांनी गैरव्यवहार केले असतील, पण जेटली त्यात व्यक्तिश: गुंतले असतील असे मला वाटत नाही, असे पवार म्हणाले. तसेच अरूण जेटलींवर व्यक्तिगत टीका करणे आपल्याला पटत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 
आजच्या तरूण खासदारांकडून आपल्याला खूप अपेक्षा असल्याचे सांगत, भारतात कार्यक्षम व योग्य तरूणांची कमतरता नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी तरूण खासदारांचे कौतुक केले. विकासाला प्राधान्य देताना राजकीय किंमत मोजावी लागली तरी सगळ्या राज्यांना बरोबर घ्यायला हवं असं सांगणारे शरद पवार म्हणजे एक सच्चा व अनुभवी राजकारणीच बोलत असल्याचे दिसत होते. 
 
शरद पवारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणा-या स्लाईडशोसाठी इथे क्लिक करा.
 
सध्या विरोधक अनेक विषयांवरून आंदोलनं करत संसदेचं कामकाज बंद पाडताना का दिसतात असं त्यांना विचारण्यात आलं. या मुद्यावर बोलताना संसदेचं कामकाज थांबवणं हा कुठल्याही समस्येवरील तोडगा होऊ शकत नाही असं सांगत, प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा असा सल्ला पवारांनी दिला. अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण भारत हेच आपलं कायम उद्दिष्ट्य राहिलेलं आहे असे ते म्हणाले. अनेक वर्ष देशाचे कृषीमंत्री पद भूषवणा-या शरद पवार यांनी भारताच्या विकासाठी कृषी क्षेत्रात काम होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं. जलअभियानावर भर देणं यावर आपण भर दिला असून त्यासाठी पुढच्या पिढीचा सहभागही अत्यंत महत्त्वाचा आहे असे आवाहनही त्यांनी केले. 

 

Web Title: Due to lack of power, the Prime Minister gave a call - Sharad Pawar's clarion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.