घरात ‘स्कोप’ नसल्याने देवेंद्र बाहेर आक्रमक !

By admin | Published: December 5, 2014 10:47 AM2014-12-05T10:47:43+5:302014-12-05T13:53:08+5:30

‘देवेंद्रंना घरात आक्रमकतेला स्कोप नाही. म्हणूनच ते मनातील भडास बाहेर काढतात.’ असे सांगत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरातील महिला शक्तीचा आवाज बुलंद असल्याचे दाखवून दिले.

Due to lack of 'scope' in the house, Devendra out aggressively! | घरात ‘स्कोप’ नसल्याने देवेंद्र बाहेर आक्रमक !

घरात ‘स्कोप’ नसल्याने देवेंद्र बाहेर आक्रमक !

Next

महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडीची पहिली जाहीर मुलाखत : अमृता फडणवीस यांनी उलगडला प्रवास

पुणे : ‘‘देवेंद्रंना घरात आक्रमकतेला स्कोप नाही. म्हणूनच ते मनातील भडास बाहेर काढतात.’’ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरात महिलाशक्तीचा आवाज किती बुलंद आहे, हे एका वाक्यात त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले आणि सभागृहात एकच हशा उसळला.
अ‍ॅक्सिस बॅँकेच्या सहयोगी उपाध्यक्ष असलेल्या अमृता यांची पहिलीच जाहीर मुलाखत ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी ‘लोकमत वुमेन समिट’मध्ये घेतली. या वेळी अमृता यांनी राजकारणापासून ते कौटुंबिक आयुष्याबाबत अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्र्यांची पत्नी हा जो टर्निंग पॉइंट ठरला याकडे कसे बघता? या प्रश्नावर अमृता म्हणाल्या, ‘‘देवेंद्र यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याने त्यांना राज्यात दौरा करावा लागला. त्यामुळे मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी मी घेतली होती. जवळपास १०० रॅलीमध्ये सहभाग घेतला. नागपूरकरांचे देवेंद्र यांच्यावर किती प्रेम आहे, हे दिसले. राजकारणातील त्यांची कारकीर्द बघता मुख्यमंत्रिपद मिळेल याची खात्री होती; पण बोलता येत नव्हते. सत्ता मिळाल्याने रिस्पॉसिबिलिटी वाढली असल्याची जाणीव होते. पद मिळाल्यामुळे या इच्छांना पंच मिळणार आहे.’’

> सगळ्या सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्याची कसरत करत असताना अमृता फडणवीस यांनी आपली गाण्याची आवडही जपली आहे. त्याचे रीतसर शिक्षणही त्या घेत आहेत, हे आवर्जून सांगताना आपल्या सुरेल आवाजात ‘अच्युतम केशवम् कृष्णा दामोदरम़़़्’ हे भजनही गाऊन दाखविले.
> लग्नानंतरच्या आपल्या करियरविषयी त्या म्हणाल्या, ‘‘लग्नाआधीपासून सुरू असलेला जॉब सुरू ठेवण्यास देवेंद्र यांनी अनुकूलता दर्शविली होती. या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा तो घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते.यातूनच पुढील वाट चालण्यास प्रोत्साहन मिळाले.’’
> महिलांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘‘घरकाम करणाऱ्या महिलेला तसेच नोकरदार महिलेला जॉब सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचे असते. दोन्ही क्षेत्रांत महिलांनी आनंदी राहणे गरजेचे असते. घरकाम तसेच नोकरी करत असलेल्या महिलांनी छंद जोपासावेत, आरोग्य सांभाळावे तसेच कुठल्याही गोष्टीचा ताण घेऊ नये.

देवेंद्रमध्ये ‘हजबंड मटेरियल’
विवाहाबाबत फडणवीस म्हणाल्या, ‘‘राजकारणी व्यक्तीशी लग्न करण्याबाबत द्विधा मनस्थिती होती. कारण माझा राजकारणाशी कधीही थेट संबंध नव्हता. परंतु, दोघांच्याही आर्इंची इच्छा होती; त्यामुळे भेटण्याचे ठरविले. टिपीकल कांदापोहे असा कार्यक्रम नको होता. त्यामुळे देवेंद्र यांच्या मित्राच्या घरी पहिली भेट झाली. ‘डाऊन टू अर्थ’ असलेल्या देवेंद्र यांच्यामध्ये ‘हजबंड मटेरियल’ पाहिलं आणि निर्णय घेतला.

Web Title: Due to lack of 'scope' in the house, Devendra out aggressively!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.