पावसाअभावी भात लागवडीला झाला उशीर

By Admin | Published: July 7, 2014 02:59 AM2014-07-07T02:59:18+5:302014-07-07T02:59:18+5:30

कोकणच्या सहा जिल्ह्यांपैकी एकट्या ठाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी दोन हजार ४०० मिमी आहे.

Due late due to the absence of rice, rice has been planted | पावसाअभावी भात लागवडीला झाला उशीर

पावसाअभावी भात लागवडीला झाला उशीर

googlenewsNext

सुरेश लोखंडे , ठाणे
कोकणच्या सहा जिल्ह्यांपैकी एकट्या ठाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी दोन हजार ४०० मिमी आहे. जून महिन्यात सुमारे ४०० ते ५५० मिमी सरासरी पाऊस पडणाऱ्या या जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी केवळ १५९.६७ मिमी पाऊस पडला आहे. या वर्षी पावसाला सुमारे २४ दिवसांचा उशीर झाल्याने जिल्ह्यातील १९८ गावांना जवळपास अतिरिक्त २७ दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. तर भातलागवड एक ते दोन आठवडे लांबणीवर गेली आहे.
उन्हाळ्यात २०० गावांना ३७ टँकरने पाणीपुरवठा करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पावसाने ओढ घेतली असती तर, टंचाईदेखील वाढत गेली. मात्र, मागील तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे टँकरचा पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे. पावसाचा लहरीपणा लक्षात घेऊन फेबु्रवारीत १४ टक्के पाणीकपात महापालिकांना लावण्यात आली होती. ती आजतागायत आहे. १५ जुलैपर्यंत धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण न वाढल्यास त्यानंतर मात्र जास्त पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे.
एक कोटी २० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार ६२१ दशलक्ष लीटर पाण्याचा वापर होत आहे. गावपाड्यांना दररोज ७.४६ दशलक्ष घनमीटर पाणी लागत आहे. २४ लघुपाटबंधारे आणि सहा केटी बंधाऱ्यांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर ५० दशलक्ष घनमीटर पाणी जिल्ह्यातील उद्योगांमध्ये वापरले जात आहे. तर ३०८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर या उद्योगधंद्यांमधील कामगारांसाठी केला जात आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आजपर्यंत एक हजार १७७.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
आज भातसा धरणात २७.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय, मोडकसागरमध्ये ४५.०५ टक्के, आंध्रात २१.३० टक्के बारवी धरणात ११.६६ टक्के सूर्याच्या कवडास व धामणीमध्ये अनुक्रमे ९७.९९ व ४५.७७ टक्के आणि तानसामध्ये ९.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
२ जुलैपर्यंत सरासरी ९२० मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. प्रारंभीच्या पावसात शेतकऱ्यांनी भातरोपांसाठी सुमारे ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असता उर्वरित ३० टक्के पेरण्यांचे काम संपण्याच्या उंबरठ्यावर आहे.
जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भाताची लागवड पूर्णत्वास येणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील एक लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र या वर्षी खरिपाखाली येणार आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर भाताची लागवड आहे. नागली १५ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावर तर वरी ११ हजार ३२० हेक्टर क्षेत्रात घेतली जात
आहे.
उर्वरितक्षेत्रावर तूर, मूग,
उडीद आणि तीळ, सोयाबीन आदी पिके घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उत्पादनवाढीसाठी ३४ हजार मेट्रीक टन खताचा वापर केला जाणार आहे. लांबलेल्या पावसावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी भातपेरणीवर टँकरद्वारे पाणी फवारणी करून भाताची रोपे वाचवली आहेत.

Web Title: Due late due to the absence of rice, rice has been planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.