यादीतील घोळामुळे राडा

By admin | Published: February 22, 2017 04:52 AM2017-02-22T04:52:08+5:302017-02-22T04:52:08+5:30

मतदार यादीतील गोंधळामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढलेली दिसून आली. वादावादीच्या घटनांप्रकरणी शहरातील विविध

Due to the list of rosary Rada | यादीतील घोळामुळे राडा

यादीतील घोळामुळे राडा

Next

मुंबई : मतदार यादीतील गोंधळामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढलेली दिसून आली. वादावादीच्या घटनांप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल १४ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निवडणुकीचे काम करत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सायनच्या अ‍ॅन्टॉपहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु शहरात कोणतीही गंभीर घडली नसल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी सांगितले.
मुलुंड पुर्वेकडील तरुण उत्कर्ष शाळेतील मतदान केंद्रावर वीज नसल्याची माहिती भाजपा आमदार सरदार तारासिंग यांना मिळाली. धिम्या गतीने सुरू असलेल्या सीस्टिमच्या कारभारामुळे मतदार वैतागले असताना येथील वीज गेली. तारासिंग यांनी केंद्रात धाव घेतली. सायंकाळी पाचच्या सुमारास तारासिंग मतदान केंद्रात पोहोचल्याचे समजताच, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या जवळपास १५० ते २०० कार्यकत्यांनी त्यांना घेराव घातला. त्यांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये तारासिंग यांना धक्काबुकी केल्याची माहिती तारासिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना बंदोबस्त पुरवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तारासिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण फक्त तेथील कर्मचाऱ्यांना विजेअभावी मतदान थांबवू नये, असा सल्ला दिला आणि तेथून निघालो. मात्र, अन्य पक्ष कार्यकत्यांच्या मनात चुकीचा समज झाल्याने त्यांनी हा प्रकार केला आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असल्याचेही तारासिंग यांनी सांगितले.
मानखुर्दच्या पीएमजी कॉलनी परिसरातील म्हाडा कॉलनी येथील रहिवाशांचे मतदार यादीत नावच नसल्याने येथील रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यातच ही बाब एमआयएमच्या उमेदवारांना समजताच, त्यांनी या विरुद्ध अन्य उमेदवाराचाच यामागे हात
असल्याचे सांगत, या ठिकाणी गोंधळ घातला.
दोन ते तीन तास या ठिकाणी गोंधळ सुरु असल्याने पोलिसांनी अधिक फौजफाटा तैनात केला. त्यानंतर, परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप आणि सहपोलीस आयुक्त देवेन भारती हेदेखील या ठिकाणी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काही वेळ वातावरण थंड झाले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा रहिवाशांनी मतदान केंद्रच बंद करण्याची मागणी केल्याने पोलिसांना पर्यायी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर, येथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आले, तर विक्रोळीत पार्क साइट परिसरात शिवसेनेचे माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांच्याविरुद्ध तक्रार करणारे शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. यामागे सुधीर मोरेंचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुनील पाटील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर भांडुपमधील मंदार शाळेतील मतदान केंद्रातील यादीतील घोळामुळे येथील केंद्र बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे काही काळ येथील परिसरात शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी घेत यावर नियंत्रण आणले. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the list of rosary Rada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.