महाविकास आघाडीमुळे बिघडल गणित; बीड जिल्हा परिषदेत भाजपसमोर कडवे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:57 PM2019-12-25T15:57:25+5:302019-12-25T15:58:44+5:30

भाजपच्या सर्व सदस्यांना सध्या तरी सहलीवर नेण्यात आले आहे. यामध्ये भाजपचे आणि भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सदस्यांचा समावेश आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे सदस्य ऱाष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे समजते. हे सदस्य सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्यास, बीड जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा झेंडा फडकविणे भाजपला कठिण जाणार आहे. 

Due to Maha vikas Aghadi Equation change in Beed Zilla Parishad | महाविकास आघाडीमुळे बिघडल गणित; बीड जिल्हा परिषदेत भाजपसमोर कडवे आव्हान

महाविकास आघाडीमुळे बिघडल गणित; बीड जिल्हा परिषदेत भाजपसमोर कडवे आव्हान

googlenewsNext

मुंबई - राज्यातील सत्तेची बदलेली समिकरणं आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या ऐक्यामुळे बीड जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर खडतर आव्हान उभे ठाकले आहे. त्यातच भाजपमध्ये प्रवेश करणारे आणि शिवसेनेचे काही सदस्य राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

गेल्यावेळी पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला शह देत बीड जिल्हा परिषद आपल्याकडे राखली होती. त्यावेळी त्यांच्याकडे राज्याच्या सत्तेच्या चाव्या होत्या. शिवाय अनेक सदस्य त्यांनी भाजपमध्ये घेतले होते. शिवसंग्रामचे तीन सदस्य पंकजा यांनी मागील अडीच वर्षाच्या काळात फोडले होते. त्यामुळे बीड जिल्हा परिषद त्यांच्याकडेच राहणार हे निश्चित मानले जात होते. 

दरम्यान महाविकास आघाडीच्या उदयामुळे सगळेच गणितं बदलली आहेत. राज्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरायचा असं तिन्ही पक्षाच्या उच्च पातळीवर निश्चित कऱण्यात आले आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषद सदस्य सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीलाच प्राधान्य देतील अशी शक्यता आहे. 

भाजपच्या सर्व सदस्यांना सध्या तरी सहलीवर नेण्यात आले आहे. यामध्ये भाजपचे आणि भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सदस्यांचा समावेश आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे सदस्य ऱाष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे समजते. हे सदस्य सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्यास, बीड जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा झेंडा फडकविणे भाजपला कठिण जाणार आहे. 
 
Web Title: Due to Maha vikas Aghadi Equation change in Beed Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.