मेट्रोच्या कामामुळे मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 08:15 AM2017-08-22T08:15:35+5:302017-08-22T11:42:17+5:30

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

 Due to Metro work, traffic congestion on Western Express Highway in Mumbai | मेट्रोच्या कामामुळे मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

मेट्रोच्या कामामुळे मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

googlenewsNext

मुंबई, दि. 22 - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मंगळवारी सकाळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मेट्रोच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतुकीच्या खोळंब्यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

 मेट्रो 3चं काम रात्री 10 ते 6 बंद राहणार 

दरम्यान, मेट्रो 3 चे काम रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेत. रात्रीच्या कामामुळे आसपासच्या नागरिकांना त्रास होत असल्याच्या याचिकेवर हे निर्देश देण्यात आलेत. कफ परेड भागातील रहिवाशी रॉबिन जयसिंगानी या व्यक्तीनं ही याचिका दाखल केली होती.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मेट्रो 3चा मार्ग आहे. 33.5 किमी अंतराचा हा मार्ग अंडरग्राऊंड अर्थात भुयारी आहे. या मार्गावर सध्या दिवसरात्र वेगाने खोदकाम सुरू आहे. मात्र रात्रीच्या वेळी यंत्रांचा आवाज, आणि खोदकाम यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. त्यांची झोडमोड होते. म्हणून किमान रात्रीच्यावेळी तरी हे काम थांबवावं अशी मागणी याचिकाकर्त्यांने केली होती. हायकोर्टाने ती मान्य केलीय. 

Web Title:  Due to Metro work, traffic congestion on Western Express Highway in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास