मुलगी कुरुप असल्याने हुंडा , 12 वीच्या पुस्तकात अकलेचे तारे
By admin | Published: February 2, 2017 11:55 PM2017-02-02T23:55:55+5:302017-02-03T00:17:14+5:30
इतिहासाच्या पुस्तकात चुकीचा इतिहास मांडल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. पण, हुंड्याची प्रथा वाढण्यामागे मुलगी कुरूप दिसण्याचं कारण दिल्याची ही पहिलीच घटना
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.2- इतिहासाच्या पुस्तकात चुकीचा इतिहास मांडल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. पण, हुंड्याची प्रथा वाढण्यामागे मुलगी कुरूप दिसण्याचं कारण दिल्याची ही पहिलीच घटना असेल. आश्चर्य म्हणजे हे अकलेचे तारे बिहार किंवा उत्तर प्रदेश नाही तर महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात तोडण्यात आले आहेत.
बारावीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात ‘देशातील प्रमुख सामाजिक समस्या’ या प्रकरणामध्ये हे भाष्य करण्यात आलं आहे. हुंड्याची प्रथा वाढण्यामागे, सामाजिक प्रतिष्ठा, जात, धर्म यासारख्या अनेक कारणांपैकी मुलगी कुरुप असणं किंवा दिव्यांग असणं हे एक कारण असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.
काय म्हटलंय पुस्तकात-
जर कोणी मुलगी कुरूप किंवा दिव्यांग असेल तर लग्न होण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा मुलीसोबत लग्न करण्यासाठी मुलाच्या कुटुंबाकडून जास्त हुंड्याची मागणी केली जाते. अशावेळी मुलींच्या पालकांकडे पर्याय नसतो आणि मुलाकडून जो मागितला असेल तो हुंडा ते देतात. हे कारण हुंड्याच्या प्रथेला वाव देतं.
''या मुद्यावर मी बोर्डासोबत चर्चा करून प्रतिक्रिया देईन'' असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर मामने यांनी म्हटलं आहे.