राष्ट्रीय पुरस्काराच्या रकमेतून दुष्काळग्रस्तांना मदत

By admin | Published: May 4, 2016 05:46 PM2016-05-04T17:46:49+5:302016-05-04T18:01:57+5:30

मसान चित्रपटसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक नीरज घायवान यानं मिळालेल्या पुरस्कारातील रकमेपैकी 50 हजारांची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देऊ केली आहे.

Due to the National Award, drought relief help | राष्ट्रीय पुरस्काराच्या रकमेतून दुष्काळग्रस्तांना मदत

राष्ट्रीय पुरस्काराच्या रकमेतून दुष्काळग्रस्तांना मदत

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4- चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणारे कलाकार दिग्दर्शक समाजाप्रति संवेदनशील असतात. मसान चित्रपटसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक नीरज घायवान यानं मिळालेल्या पुरस्कारातील रकमेपैकी 50 हजारांची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देऊ केली आहे.   
नीरज घायवान यानं पदार्पणातील सर्वोकृष्ट चित्रपट दिग्दर्शक होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांना पुरस्काराच्या स्वरूपात 1.25 लाखांची रक्कम मिळाली आहे. त्यापैकी त्यांनी 50 हजार रुपये दुष्काळग्रस्तांना देण्याचं जाहीर केलं आहे. नीरज घायवान यांनी अशी माहिती टि्वटरच्या माध्यमातून दिली आहे. 
मी देऊ केलेली रक्कम ही फारच कमी आहे, मात्र त्या गोष्टीतून दुष्काळग्रस्तांकडे समाजाचं लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न असल्याचं टिवटरच्या माध्यमातून नीरज घायवान यांनी सांगितलं आहे. 

Web Title: Due to the National Award, drought relief help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.