नियमांची पायमल्ली न केल्याने चालकाला मारहाण ; उद्योगपती नेस वाडियांचा प्रताप

By admin | Published: May 19, 2016 07:12 PM2016-05-19T19:12:40+5:302016-05-19T19:12:40+5:30

बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटाला मारहाण केल्याच्या आरोपावरुन चर्चेत आलेले उद्योगपती नेस वाडिया पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Due to not violating rules, the driver is beaten; Businesswoman Ness Wadia Pratap | नियमांची पायमल्ली न केल्याने चालकाला मारहाण ; उद्योगपती नेस वाडियांचा प्रताप

नियमांची पायमल्ली न केल्याने चालकाला मारहाण ; उद्योगपती नेस वाडियांचा प्रताप

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ : बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटाला मारहाण केल्याच्या आरोपावरुन चर्चेत आलेले उद्योगपती नेस वाडिया पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. गाडी पळवित नसल्याने स्वत:च्याच चालकाला वाडिया यांनी शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी चालकाने एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारदार विरेंद्र मिश्रा वाडियांकडे गेल्या तीन वर्षांपासून चालक म्हणून काम करतात. वाकोला येथील डिमेलो कम्पाऊंड येथे मिश्रा राहण्यास आहे. बुधवारी दुपारी वाडिया यांना फोर्ट येथे महत्त्वाच्या बैठकीसाठी जायचे असल्याने त्यांनी गाडी बाहेर काढण्यास सांगितले. त्यानुसार मिश्रा याने गाडी (एमएच ०१ बीबी १३०१) बाहेर काढली. फोर्ट परिसरात लवकर पोहचायचे असल्याने त्यांनी मिश्राला गाडी जलदगतीने चालविण्यास सांगितली. रस्त्यात येणारे सिग्नलकडेही त्यांनी दुर्लक्ष करण्याचा सल्ला मिश्राला दिला असल्याची माहिती मिश्राने पोलिसांना दिली.
मात्र, मिश्राने वाहतूकीचे नियम पाळत सिग्नल तोडले नाही. त्याचप्रमाणे गाडीचा वेग देखील जेमतेम ठेवला असल्याने नेसवाडियांचा रागात भर पडली. त्यांनी पाठिमागून मिश्राला शिविगाळ देण्यास सुरुवात केली. तसेच जे.जे उडडाणपुलावरुन खाली उतरल्यानंतर त्यांनी चालकाला लाथा मारण्यास सुरुवात केली. अशावेळी मिश्राने गाडी रस्त्याच्या बाजुला लावून तो बाहेर निघाला. संतापलेल्या मिश्राने गाडी चालविण्यास नकार दिला. तर वाडियाने मिश्राला शिविगाळ करत स्वत: गाडी चालवित ते तेथून निघून गेले. त्यानंतर मिश्राने एमआरए मार्ग पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी वाडिया विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
मिश्राच्या तक्रारीची नोंद करत अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिली.

 

Web Title: Due to not violating rules, the driver is beaten; Businesswoman Ness Wadia Pratap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.