आदिवासींचे दमन केल्यास ते नक्षलवादाकडे वळतील- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 05:13 AM2019-01-31T05:13:27+5:302019-01-31T05:13:47+5:30

आदिवासींची संस्कृती, व्यवस्था, व्यवहारांची भिन्नता लक्षात घेऊन शासनाने धोरणात्मक, कायदेशीर बदल करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Due to the oppression of the tribals, they will turn towards Naxalism - Prakash Ambedkar | आदिवासींचे दमन केल्यास ते नक्षलवादाकडे वळतील- प्रकाश आंबेडकर

आदिवासींचे दमन केल्यास ते नक्षलवादाकडे वळतील- प्रकाश आंबेडकर

Next

अकोला : जंगलावर हक्क असलेल्या आदिवासींना जगण्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे धोरण शासन रेटत आहे. त्यातून त्यांचे दमन झाल्यास हक्क अबाधित ठेवण्यासाठी ते नक्षलवादाकडे वळण्याची शक्यता आहे. आदिवासींची संस्कृती, व्यवस्था, व्यवहारांची भिन्नता
लक्षात घेऊन शासनाने धोरणात्मक, कायदेशीर बदल करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

ते म्हणाले, इंग्रज काळापासून आदिवासींवर अन्याय केला जात आहे. त्यांना वनहक्क दिले. त्याचवेळी त्यांना जगण्याएवढेच अधिकारही दिले. त्यानंतर इंग्रजांची मानसिकता कायम असलेल्या भारतीय राज्यकर्त्यांनी पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली, अमाप वनसंपत्ती लुटण्याच्या उद्देशाने कायद्यात बदल केला. १९८० मध्ये केलेल्या कायद्याने आदिवासींचा हक्कच हिरावण्यात आला. पर्यावरणातील जीवसाखळीचा विचार न करता त्यांच्या शिकारीवरही बंदी आणली. रेशनच्या दुकानावर त्यांचे अवलंबित्व वाढले.

Web Title: Due to the oppression of the tribals, they will turn towards Naxalism - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.