Maharashtra Election 2019; शेतकºयांच्या तळतळाटामुळे काँग्रेस पक्ष होणार नामशेष : पाशा पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:16 PM2019-10-16T12:16:14+5:302019-10-16T12:18:59+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सभा
मंद्रुप : काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत शेतीमालाला कधीच योग्य भाव दिला नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन हजारो शेतकºयांनी आत्महत्या केल्या. शेतकºयांचा तळतळाट लागल्यानेच देशभरात काँग्रेस नामशेष होत आहे, असे प्रतिपादन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी येथे बोलताना केले.
औज मंद्रुप व होटगी येथे दक्षिण सोलापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाशाभाई पटेल बोलत होते.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षांत दक्षिण सोलापूरसाठी साडेचौदाशे कोटींचा निधी आणल्याचे सांगितले. काँग्रेसने देशभरात ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. आम्ही शेतकºयांना सरसकट दीड लाखाची कर्जमाफी दिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी साथ द्या असे आवाहन केले.
यावेळी सभापती सोनाली कडते, आप्पासाहेब पाटील, रामाप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, शिरीष पाटील, मौलाली मकानदार, उपसभापती संदीप टेळे, जि. प. सदस्य प्रभावती पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर नरसगोंडे, शिवानंद दरेकर, शशिकांत दुपारगुडे, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, प्रशांत कडते, सुशीला ख्यामगोंडे आदी उपस्थित होते.