पावसाने ओढ दिल्याने नाशकात पेरण्या संकटात

By admin | Published: July 6, 2014 01:05 AM2014-07-06T01:05:54+5:302014-07-06T01:05:54+5:30

अगदी 7 जूनलाच नियमाने हजेरी लावण्याची नाशिकला परंपरा असलेल्या पावसाने गेल्या वर्षापासून ‘हजेरीत’ बदल केल्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता काहीशी वाढली आहे.

Due to the pouring of rain in the crisis of sowing | पावसाने ओढ दिल्याने नाशकात पेरण्या संकटात

पावसाने ओढ दिल्याने नाशकात पेरण्या संकटात

Next
गणोश  धुरी - नाशिक
अगदी 7 जूनलाच नियमाने हजेरी लावण्याची नाशिकला परंपरा असलेल्या पावसाने गेल्या वर्षापासून ‘हजेरीत’ बदल केल्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता काहीशी वाढली आहे. यंदा तर जून संपून जुलै उजाडला तरी तुरळक अपवाद वगळता मान्सूनने दडी मारल्याने खरिपाच्या साडेसहा लाख हेक्टरवरील पेरण्या संकटात सापडल्या असून, भात-नागली पिके हातची जाण्याची भीती व्यक्त आहे, तर तूर, भुईमुगाची पिके पावसाअभावी जळाल्याने या हंगामात या पिकांचे उत्पादन नगण्य राहण्याचा धोका वाढला आहे. 
गंगापूर धरणाचा अपवाद वगळता अन्य धरणांमध्ये 1क् ते 15 टक्क्यांच्या आतच जलसाठा असून, नाशिक शहरात आता पाणीकपात सुरू होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या पर्जन्यमानाची आकडेवारी पाहिल्यास 2 जुलैर्पयत मागील वर्षी 249 मिलिमीटर पाऊस झाला होता, यावर्षी तो अवघा 28.75 मि.मी. इतकाच झाला आहे. 
   पाऊस लांबल्याने खतांच्या विक्रीवरही प्रतिकूल परिणाम होऊन 4क् हजार मेट्रिक टनांहून जादा खते विक्रीअभावी पडून आहेत. लांबलेल्या पावसाने कापूस, मका या पिकांचे क्षेत्र घटून बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागातील सूत्रंनी व्यक्त केली आहे. 
 
खरिपाच्या पेरण्यांवर संकट
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख 34 हजार 6क्क् हेक्टर असून, यावर्षी पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. ज्या काही 444 हेक्टर क्षेत्रवरील नाममात्र पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत, त्यात मका, तूर, कापूस या पिकांसह ऊसाचा समावेश आहे. 
धरणो कोरडीठाक
हवामान खात्याचा अंदाज पावसाने यावेळी खरा ठरविला आहे. जिल्ह्यातील धरणांची स्थिती बिकट झाली असून, यांतील जलसाठय़ाचे प्रमाण नऊ टक्के इतके अत्यल्प राहिले आहे. गौतमी गोदावरी, तीसगाव, कश्यपी, मुकणो, कडवा, भोजापूर, हरणबारी व नागासाक्या या आठ धरणांनी तळ गाठला आहे.
 
कमी झालेली सरासरी
 गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी 1 जून ते 2 जुलैदरम्यान अत्यंत नाममात्र म्हणजेच 284 मिलिमीटर इतकी कमी राहिलेली आहे. यावर्षी 1 जून ते 2 जुलै यादरम्यान अवघा 431.3 मि़मी़ पाऊस झालेला आह़े  
वार्षिक सरासरीच्या 28 } 
जिल्ह्याची वार्षिक सरासरी 1क्13.39 इतकी असताना, 2 जुलै 2क्13 ला 249.37 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद नोंदविण्यात आली होती. यावर्षी वार्षिक सरासरीच्या 1 जून ते 2 जुलै दरम्यान पावसाची अवघी 28.75 मि़मी़ इतकी नाममात्र नोंद झाली आहे.
टॅँकरचे दीड शतक
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाण्याची टंचाई जाणवत असून, त्यासाठी जूनअखेर 541 गावे व वाडय़ांना 161 टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात सर्वाधिक सिन्नर - 71, बागलाण- 28, सुरगाणा- 14, त्र्यंबकेश्वर, चांदवड व देवळा प्रत्येकी- 1क्, दिंडोरी- 2, पेठ- 4, येवला- 1, मालेगाव- 1, कळवण-1, नांदगाव- 2 व भगूर- 2 टँकरचा समावेश आह़े 
कापूस, मका घटणार
पाऊस लांबल्याने खरिपात लागवड केलेली भुईमूग व तूर पिके जळाली असून, या पश्चिम भागातील भात व नागलीच्या पेरण्या उशिरा होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Due to the pouring of rain in the crisis of sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.