पावसाच्या वक्रदृष्टीमुळे धरणे आटली!

By admin | Published: August 3, 2015 02:01 AM2015-08-03T02:01:37+5:302015-08-03T02:01:37+5:30

जूनच्या मध्यानंतर महाराष्ट्रावर पावसाने वक्रदृष्टी केल्याने एकीकडे खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती असताना अपुऱ्या पावसामुळे राज्यातील

Due to rain curtain! | पावसाच्या वक्रदृष्टीमुळे धरणे आटली!

पावसाच्या वक्रदृष्टीमुळे धरणे आटली!

Next

पुणे : जूनच्या मध्यानंतर महाराष्ट्रावर पावसाने वक्रदृष्टी केल्याने एकीकडे खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती असताना अपुऱ्या पावसामुळे राज्यातील धरणेही आटली आहेत. दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती असून, ८१४ प्रकल्पांत केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मान्सूनच्या आगमनानंतर जून आणि जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद होते. मात्र दीड महिन्यापेक्षाही अधिक काळ पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील २ हजार ५२६ धरणांमध्ये केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या तीन वर्षांतील हा नीचांक आहे.
त्यातच आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मंदावत जाणाऱ्या पावसामुळे ही टक्केवारी वाढेल की नाही, याबाबत शंका आहे.
कोकणातील १५८ प्रकल्पांची स्थिती तुलनेने बरी असून, ६९ टक्के जलसाठा झाला आहे. विभागानुसार मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांत ७ टक्के, नागपूरच्या ३६६ प्रकल्पांत ३६ तर अमरावतीच्या ४५३ धरणांमध्ये ३२ टक्के पाणी आहे. नाशिकमधील ३५० प्रकल्प ३८ आणि पुणे विभागातील ३६९ धरणे ४५ टक्क्क्यांपर्यंतच भरली आहेत.
राज्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा २ हजार ५२६ धरणांमध्ये ३७ हजार ५०७ दशलक्ष घनमीटर प्रकल्पीय साठा झाला असून, त्यापैकी केवळ १४ हजार ३१२ दशलक्ष
घनमीटर साठा उपयुक्त, म्हणजे पिण्याचे पाणी व शेतीसाठी वापरण्याजोगा आहे.
राज्यातील २,५२६ धरणांमध्ये गेल्या वर्षी २ आॅगस्टच्या सुमारास १८ हजार ४०२ द.ल.घ.मी. म्हणजे ४९ टक्के तर २०१३मध्ये ६७ टक्के म्हणजे २५ हजार ३४ द.ल.घ.मी. उपयुक्त साठा होता. गेल्या वर्षाशी तुलना करता यंदा ११ टक्के व २०१३च्या तुलनेत २९ टक्के कमी साठा आहे.
कोकण, मराठवाडा, नागपूर, अमरावती, नाशिक व पुणे विभागातील मोठ्या धरणांची संख्या ८४ असून,
त्यात ७,७७३ द.ल.घ.मी, २२२
मध्यम प्रकल्पांमध्ये १,५९१ द.ल.घ.मी
तर २,२०४ लघू प्रकल्पांमध्ये
१,१७२ द.ल.घ.मी. साठा
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to rain curtain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.