नवरात्रौत्सवावर पावसाचे सावट
By admin | Published: October 3, 2016 03:15 AM2016-10-03T03:15:00+5:302016-10-03T03:15:00+5:30
गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने गरबाप्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.
मयूर तांबडे,
पनवेल- गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने गरबाप्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. पावसामुळे गरबा होत नसल्याने तरुणाई नाराज आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्यामुळे नवरात्रोत्सवावर पावसाचे सावट दिसून येत आहे.
पनवेल शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात शेकडो ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून देवींच्या मूर्तींची स्थापना करण्यात येते. गुजराती समाजात खेळला जाणारा गरबा आता संपूर्ण देशात खेळला जात आहे. त्यामुळे दरवर्षी गरबा/दांडिया खेळणाऱ्यांची व पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक मंडळांनी नवरोत्सवाच्या तीनचार दिवस आधीपासूनच आजूबाजूचा परिसर स्वच्छ व साफ करून घेतला. मात्र यंदा पावसामुळे गरबाप्रेमींचे दोन दिवस वाया गेल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
दरवर्षी गरबा तसेच दांडिया नृत्यावर मोठमोठी पारितोषिके लावली जातात त्यामुळे गरबा अधिकच खुलतो. पारितोषिके लावल्यामुळे गरबा खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गरबा/दांडियाप्रेमी तर महिनाभर आधीपासून उत्सवाच्या तयारीला लागतात. यात नृत्याचे वर्गही घेतले जातात. पारंपरिक वेशभूषेबरोबरच ज्वेलरी, मोजडी आदींचीही खरेदी केली जाते. सरावासाठी प्रशिक्षण वर्गही आयोजित केले जातात.
शनिवार, रविवार सुटीचे दिवस असल्याचे यादिवशी तरुणाईची गरबा/दांडिया खेळण्यासाठी मोठी गर्दी होते. मात्र यंदा पावसामुळे गरब्याचे दोन दिवस वाया गेले आहेत. सार्वजनिक मंडळाची मैदानेही सुनेसुने आहेत. गरबाप्रेमीना आर्केष्ट्राद्वारे तरु णाईला फेर धरता आले नाहीत. त्यामुळे ते नाराज झाले आहेत.
नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठ सजली आहे. आकर्षक कपडे, दांडिया, आल्हाददायक मोजडी आणि दागिने बाजारात उपलब्ध आहेत. पनवेलच्या बाजारपेठेत नवरात्रीनिमित्त विविधरंगी पेहराव दाखल झाले आहेत. यासाठी व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणावर सूरत आण िगुजरातहून खरेदी केल्याचे चित्र दिसत आहे. दांडिया आण िगरबा खेळताना पारंपरिकतेचा लूक येण्यासाठी खास करून तरु णाई सजग आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या दांडिया घेऊन तरु णाई सज्ज आहे. मात्र पावसामुळे रंगाचा बेरंग झाल्याची प्रतिक्रि या तरु णाई देत आहे.