आरक्षणाच्या मोर्चामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी

By admin | Published: October 8, 2016 02:58 AM2016-10-08T02:58:16+5:302016-10-08T02:58:16+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर तसेच रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Due to the reservation for the road, the traffic congestion on the highway | आरक्षणाच्या मोर्चामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी

आरक्षणाच्या मोर्चामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी

Next


मुंब्रा : मुस्लिमांना आरक्षण मिळावे, यासाठी मुंब्य्रात शुक्र वारी काढण्यात आलेल्या पहिल्या मोर्चाला झालेल्या गर्दीमुळे
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर तसेच रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
हा मोर्चा साधारण सव्वा तास चालला. तोवर मुख्य मार्गावरील वाहतूक थांबली होती. काही वाहतूक वळवण्यात आली असली तरी मुख्य मार्गच बंद असल्याने वाहतूक ठप्प होती. नंतरही ती पूर्ववत होण्यास बराच काळ गेला.
ज्यावेळी आरक्षणाचा निर्णय रद्द झाला, तेव्हाही राज्यात केवळ मुंब्रा येथेच मोर्चा काढण्यात आला होता. ठाणे महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आल्याने या मोर्चातून ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न होईल, असा अंदाज होता. तो काही प्रमाणात यशस्वीही झाला. मात्र मूक मोर्चा असल्याने भाषणे झाली नाहीत. त्यामुळे अन्य प्रश्नांची चर्चा झाली नाही.
या मोर्चात सामाजिक, धार्मिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच किमान वेतन सल्लागार आयोगाचे अध्यक्ष सय्यद अली अशरफ, राष्ट्र्वादीचे काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परंतु इतर पक्षाचे पदाधिकारी, नेते सहभागी झाले नाहीत. (वार्ताहर)
>दुर्गंधीमुळे मोर्चेकरी त्रस्त
मोर्चाचा समारोप ज्याठिकाणी झाला, त्या रेल्वे स्टेशनजवळील एम प्रवेशद्वाराजवळ मोकळ््या जागेत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग गोळा करून ठेवण्यात आले होते. त्याच्या दुर्गंधीमुळे मोर्चात सहभागी झालेले नागरिक त्रस्त झाले.

Web Title: Due to the reservation for the road, the traffic congestion on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.