साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारांत ‘दिल्ली’मुळे वाढ!
By admin | Published: June 15, 2017 02:00 AM2017-06-15T02:00:14+5:302017-06-15T02:00:14+5:30
९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. तसे झाल्यास राजधानीतील या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदाचा
शफी पठाण । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. तसे झाल्यास राजधानीतील या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळविण्यासाठी उमेदवारांची संंख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत विदर्भातील डॉ. रवींद्र शोभणे, पुण्याचे राजन खान व रवींद्र गुर्जर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून, विदर्भातीलच संत साहित्य अभ्यासक डॉ. किशोर सानप यांचीही उमेदवारी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया आॅक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. गतवर्षी अखेरच्या महिन्यापर्यंतही केवळ दोघांनीच उमेदवारी जाहीर केली होती. यंदा मात्र चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाही शोभणे, खान, गुर्जरांनी आपली उमेदवारी जाहीर करून प्रचाराची आखणीही सुरू केली आहे.
ठाले पाटलांची पसंती न्या. चपळगावकरांना
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना समर्थन मिळविण्यासाठी ठाले पाटील प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे.