रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बाळ गर्भातच दगावले - कुटुंबियांचा आरोप

By Admin | Published: August 19, 2016 09:45 AM2016-08-19T09:45:14+5:302016-08-19T09:47:16+5:30

उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील खड्ड्यामुळे एका महिलेच्या गर्भातील बाळ दगावल्याची धक्कादायक घटना घडली.

Due to road potholes, the baby suffers from fetus - Family accusation | रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बाळ गर्भातच दगावले - कुटुंबियांचा आरोप

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बाळ गर्भातच दगावले - कुटुंबियांचा आरोप

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. १९ - राज्यभरातील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच असून याच खड्ड्यांमुळे एका महिलेला आपले बाळ गमवावे लागल्याची अतिशय दु:खद व धक्कादायक घटना घडली आहे. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातल्या बोरवंटी ते मंगरुळ पाटी दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महिलेच्या गर्भातच तिचे बाळ दगावले, असा आरोप अर्भक तिच्या  कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान या महिलेची प्रकृती गंभीर असून सध्या तिच्यावर अंबाजोगाई रुग्णालयात उपचार सुरु  असल्याचे समजते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेच आपल्या बाळाला गमवावे लागले, असं महिलेच्या कुटुंबीयांच म्हणणं आहे.

Web Title: Due to road potholes, the baby suffers from fetus - Family accusation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.