रोडरोमिओंमुळे विद्यार्थिनी असुरक्षित

By admin | Published: July 22, 2016 01:27 AM2016-07-22T01:27:33+5:302016-07-22T01:27:33+5:30

पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी २५ कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या

Due to roadromomism, the girl is unsafe | रोडरोमिओंमुळे विद्यार्थिनी असुरक्षित

रोडरोमिओंमुळे विद्यार्थिनी असुरक्षित

Next


पिंपरी : छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी २५ कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. आठवड्यातून दोनदा शाळा, महाविद्यालयांना भेटी द्याव्यात, तक्रार पेटीत विद्यार्थिनींनी दाखल केलेल्या तक्रारींची दखल घ्यावी, असे सुचविले असताना त्याची अंमलबजावणी मात्र प्रभावीपणे होत नसल्याचे लोकमत टीमने केलेल्या पाहणीत निष्पन्न झाले आहे.
पिंपरी परिसरामध्ये मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या अशा एकूण ११ शाळा आहेत. या शाळांंमध्ये पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसंदर्भात बीट मार्शल पोलिसांना आठवड्यातून दोनदा गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटला आहे. या
महिनाभरात बीट मार्शल पोलीस किती वेळा शाळेत गस्त घालण्यासाठी आले, ज्या ज्या वेळेस गस्तीवर येतात, त्या वेळेस मुख्याध्यापकांना भेटतात का, शाळेत तक्रारपेटी ठेवली आहे का,
तक्रार केल्यावर पोलीस लगेच येतात का, अशा प्रकारची माहिती
शाळेच्या मुख्याध्यापकांकडून जाणून घेतली असता, बहुतांश मुख्याध्यापकांनी बीट मार्शल
गस्तीवर येत नसून,शाळेच्या परिसरामध्येही फिरताना दिसले नाहीत, असे सांगितले.
विद्यार्थिनींसाठी तक्रारपेटी ठेवण्यात आलेली नसल्याचेही मुख्याध्यापकांनी सांगितले, तर काही मुख्याध्यापकांनी दिवसातून दोन
वेळा बीट मार्शल गस्त घालण्यासाठी येतात. मात्र, प्राचार्यांना न
भेटता शाळेच्या बाहेरूनच निघून जातात. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने विद्यार्थिनींची स्वतंत्र बैठकदेखील घेतली नसल्याचेही प्राचार्यांनी सांगितले.
दरम्यान विद्यार्थींनींच्या सुरक्षितेसाठी पोलिसांनी शाळा सुरू होतांना व शाळा सुटण्याच्या वेळेस शाळा परिसरात गस्त घालावी आणि परिसरामध्ये फिरणाऱ्या टवाळखोरांवर कडक कारवाई करावी. आणि शाळेमध्ये तक्रार पेटी ठेवावी.ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्या या पेटीच्या माध्यमातून मांडता येतील. अशी अपेक्षा यावेळी मुख्याध्यापकांनी केली.
तक्रारपेटीचा अभाव
भोसरी : गुंडगिरीमुळे चर्चेत असणाऱ्या या परिसरामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या बाबतीत पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. परिसरातील अनेक शाळांमध्ये तक्रारपेटीच नाही. ज्या काही मोजक्या शाळांमध्ये तक्रारपेट्या होत्या, त्याही धूळ खात पडलेल्या दिसून आल्या.
याशिवाय विद्यार्थिनींशी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित पोलीस स्टेशनमधील महिला अधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये
जाऊन संवाद साधणे गरजेचे आहे. मात्र असे कोणतेही उपक्रम पोलिसांकडून राबवले जात नसल्याचे अनेक शाळांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तसेच शाळा भरते व सुटतेवेळी अनेक टवाळखोर मुले शाळेबाहेरील परिसरामध्ये धिंगाणा घालतात. शिक्षक अथवा पालकांनाही ते जुमानत नाहीत. अनेकवेळा शाळेच्या रखवालदारांबरोबर टवाळखोर तरुण वादही घालतात. त्यामुळे पोलिसांनी शाळा परिसरामध्ये नियमित गस्त घालून रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिक्षक आणि पालकांकडून केली जात आहे. मुलींना टवाळखोरीचा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता पालक, शिक्षक किंवा थेट पोलिसांकडे तक्रार करावी. तसेच विद्यार्थिनींना आत्मरक्षण करता यावे, यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये आठवड्यातून दोन दिवस ज्युडो-कराटेचे प्रशिक्षण घेतले जावे, अशी सूचना सुचिता कोळेकर या विद्यार्थिनीने केली.
>आकुर्डीत गस्त, निगडीत दुर्लक्ष
निगडी : आकुर्डी परिसरात पोलिसांची नियमित गस्त असल्याने या भागात टवाळखोरीस चाप बसला आहे. परंतु, निगडी भागात पोलिसांची गस्त नसल्याने या भागात टवाळखोरीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, लोकमतने निगडी पोलीस स्टेशन परिसरातील शाळा व महाविद्यालयांचे सर्वेक्षण केले. या वेळी आकुर्डीत टवाळखोरी रोखण्यासाठी नियमित असलेली गस्त, शाळा-महाविद्यालयांना पोलिसांच्या भेटी व तक्रारपेटी या सर्व कारणांमुळे टवाळखोरीचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. निगडीमध्ये मात्र शाळा-महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Due to roadromomism, the girl is unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.