सरकारच्या भूमिकेमुळे डान्सबारचा मार्ग मोकळा-मुंडे

By admin | Published: November 27, 2015 03:25 AM2015-11-27T03:25:42+5:302015-11-27T03:25:42+5:30

डान्सबारबंदीच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयानं दीड महिन्यापूर्वी स्थगिती दिल्यानंतर शासनाने वेगात पावले उचलून सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडायला हवी होती

Due to the role of the government, Mokal-Munde's path to dance bars | सरकारच्या भूमिकेमुळे डान्सबारचा मार्ग मोकळा-मुंडे

सरकारच्या भूमिकेमुळे डान्सबारचा मार्ग मोकळा-मुंडे

Next

मुंबई : डान्सबारबंदीच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयानं दीड महिन्यापूर्वी स्थगिती दिल्यानंतर शासनाने वेगात पावले उचलून सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडायला हवी होती, परंतु तसे काहीच घडले नाही, उलट डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राज्यात डान्सबार पुन्हा सुरु करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावर प्रतिक्रिया देताना मुंडे म्हणाले, राज्यात डान्सबार सुरु व्हावेत आणि त्यातून गोरगरिबांचे संसार उद्धवस्त व्हावेत, असाच कदाचित भाजपा शिवसेना सरकारचा हेतू असावा आणि तो आता साध्य झाला आहे. डान्सबार सुरू झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण तर होईल. शिवाय, मुंबईसह संपूर्ण राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडेल. डान्स बार बंदी बाबत सरकार परत अध्यादेश कडक कायदा आणत असेल तर सरकार सोबत राहू असेही ते म्हणाले.

Web Title: Due to the role of the government, Mokal-Munde's path to dance bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.