लागले रे लागले ... लातुरात गाढवाचे लग्न लागले...!
By admin | Published: August 3, 2016 05:06 PM2016-08-03T17:06:28+5:302016-08-03T19:09:48+5:30
शहरातील मुस्लिम समाजासाठी प्रस्तावित शादीखान्याचे उद्घाटन होऊनही अद्यापही शादीखाना बांधण्यात आला नाही. याचा राग आलेल्या कार्यकर्त्यांनी चक्क गाढवाचं लग्न लावलं.
Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ३ - शहरातील मुस्लिम समाजासाठी प्रस्तावित शादीखान्याचे उद्घाटन होऊनही अद्यापही शादीखाना बांधण्यात आला नाही. याचा राग आलेल्या कार्यकर्त्यांनी चक्क गाढवाचं लग्न लावलं. पत्रिका छापल्या. बँड लावला आणि वर्हाडींच्या उपस्थितीत लग्न लागताच ताशावर नृत्य करून आनंदही साजरा केला.
महापालिकेच्या वतीने शहरातील शाहु चौक परिसरातील लाल गोडावूनच्या जागेत शादिखाना बांधण्याचा सर्वसाधारण सभेत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार शादीखान्याचे उद्घागटन आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते़ उद्घागटनाचा सोपस्कार पूर्ण होऊन दहा महीने झाले तरी त्याचे बांधकाम काही सुरू झाले नाही. त्यामुळे शादीखान्याचे आश्वासन हवेतच राहिले आहे़. महापालिकेच्या याच दुर्लक्षाच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी शादीखान्याच्या प्रस्तावीत जागेत गाढवाचा विवाह आयोजित करण्यात आला होता़ त्यासाठी लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. या विवाहासाठी शामियाना मंडप उभारण्यात येऊन वाजंत्रीही होते. कार्यकर्त्यांनी दोन गाढवांना बाशिंग बांधून, गळ्यात गुलाबाच्या फुलांचे हार घालून लग्न लावले. या लग्नाची शहरात मात्र चांगलीच चर्चा रंगली.
यावेळी कार्यकर्त्यांसह विवाह समारंभाला अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र विकास अघाडीचे शहराध्यक्ष शेख इस्माईल फुलारी, नगरसेवक नवनाथ अल्टे, मुस्लिम विकास परिषदेचे मोहसीन खान, मुस्लिम योद्धचे वाजीद मणियार, इरफान शेख, मोहम्मद गौस, नाजीम शेख, जमीर सय्यद, ताहेर सय्यद, उमर कलाल, शार्दुल शेख, रियाज शेख, रफिक शेख, समिर शेख, विशाल कांबळे, अबेद शेख, महाराष्ट्र विकास अघाडीचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या सख्येने उपस्थित होते.