सेल्फी काढताना धबधब्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2016 11:01 PM2016-09-04T23:01:14+5:302016-09-04T23:01:14+5:30
तोल गेल्याने पवन नामदेव शिंदे (वय २०, रा.धुळे) याचा पाटणादेवी (ता. चाळीसगाव) येथील धवलतीर्थ धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला
Next
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 4 - सेल्फी काढत असताना तोल गेल्याने पवन नामदेव शिंदे (वय २०, रा.धुळे) याचा पाटणादेवी (ता. चाळीसगाव) येथील धवलतीर्थ धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ४ रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.
पवन हा धबधबा पाहण्यासाठी आला होता. स्वत:च्या मोबाईलमध्ये सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो धबधब्यालगतच्या डोहात बुडाला. पोलीस पाटील मनोज साहेबराव परदेशी यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.