गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट

By admin | Published: July 8, 2015 02:40 AM2015-07-08T02:40:51+5:302015-07-08T02:40:51+5:30

गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट असून, या परिसरात अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी राज्य सरकारने केली आहे.

Due to skyscrapers, the crash of the plane crash on Mumbai | गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट

गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ व जुहू विमानतळाजवळ होऊ घातलेल्या गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट असून, या परिसरात अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
विमानतळापासून २० कि़ मी. अंतरात बांधकाम करण्यासाठी विमान प्राधिकरण परवानगी देते. याअंतर्गत ४९.८७ मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जात होती. मात्र इमारतींना उंचीसंदर्भात देण्यात येणाऱ्या ना-हरकत प्रमाणपत्रांचे निकष ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या नेगी समितीने उंचीची मर्यादा ५६.२७ मीटरपर्यंत वाढविली. त्यानंतर २००८ -१२ या काळात जुहू व आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात २०० इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. या इमारतींमुळे मुंबईला विमान दुर्घटनेचा धोका आहे, असा दावा करणारी जनहित याचिका अ‍ॅड. यशवंत शिनॉय यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच या दोन्ही विमानतळांच्या धावपट्टीजवळ सुरक्षेचे कोणतेही उपाय करण्यात आलेले नाहीत. या धावपट्टींजवळ सुरक्षेचे उपाय करावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
या याचिकेवर प्रत्युत्तर सादर करताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. ने व नागरी दळणवळण महासंचालकांनी ही जबाबदारी आमची नसल्याचा दावा केला. तर विमानतळ प्राधिकरणाने नेगीच्या रिपोर्टनुसार विमानतळ परिसरात इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे म्हटले आहे.
अ‍ॅड. शिनॉय यांनी मंगळवारी या सर्व प्रतिज्ञापत्राचा तपशील न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सांगितला. याचे प्रत्युत्तर सादर करण्यास वेळ मागितला. तसेच या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. त्याची दखल घेत न्यायालयाने या याचिकेवर पुढील शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले.
(प्रतिनिधी)

लँडिंग-टेकऑफवेळी संपर्क तुटण्याची भीती
 
लँडिंग होताना पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात असतो. कंट्रोलच्या दिशा निर्देशानुसार विमानाचे सुरक्षित लँडिंग होते. असे असताना 56.27 मीटर उंचीच्या इमारती विमानतळ परिसरात उभ्या राहिल्यास पायलटचा व कंट्रोलच्या संपर्कातही अडचणी निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. नेमके लँडिंग व टेकऑफवेळी संपर्क तुटल्यास मोठी विमान दुर्घटना होऊ शकते, असा दावा याचिकाकत्र्याने केला आहे.
------------------
... शेकडो नागरिकांचा जाऊ शकतो बळी
मुळात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसराला झोपड्यांचा विळखा अधिक आहे. यामुळे विमान दुर्घटना झाल्यास येथील शेकडो नागरिकांचा बळी जाऊ शकतो. तिच परिस्थिती जुहू विमानतळाची आहे. हा परिसर देखील झोपड्यांनी व्याप्त असून अधिक उंचीच्या इमारतींची संख्या देखील या परिसरात आहे. जुहू विमानतळावर सध्या ओएनजीसीसह खाजगी विमानांचे आवागमन असते.

Web Title: Due to skyscrapers, the crash of the plane crash on Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.