दुबार पेरणीचे शेतकऱ्यांवर संकट

By admin | Published: June 27, 2016 02:06 AM2016-06-27T02:06:25+5:302016-06-27T02:06:25+5:30

दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने सगळ्यांना आनंद झाला असला तरीही पावसाची प्रतीक्षा करणारा अन्नदाता यामुळे संकटात सापडला आहे.

Due to the sowing of farmers of drought | दुबार पेरणीचे शेतकऱ्यांवर संकट

दुबार पेरणीचे शेतकऱ्यांवर संकट

Next


पेण : दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने सगळ्यांना आनंद झाला असला तरीही पावसाची प्रतीक्षा करणारा अन्नदाता यामुळे संकटात सापडला आहे. खारभूमी क्षेत्रातील ९३ गावांची शेतीमधील केलेली धूळ पेरणीचा पाहणी दौरा पेण तालुका कृषी विभागाने नुकताच केला असता तब्बल ९०० हेक्टर क्षेत्रावरील धूळ पेरणीची अवस्था बिकट झाली असल्याचे अधिकारी व कृषी सहाय्यकांच्या पथकाला आढळले. याबाबतचा अहवाल कृषी विभागाने सादर केला असल्याचे तालुका कृषी कार्यालयीन सूत्रांनी सांगितले. यामुळे पेणच्या खारभूमी क्षेत्रातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे नवे संकट कोसळले आहे.
खारभूमी क्षेत्रातील शेती करणे शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. दरवर्षी ही समस्या कायम उद्भवते. मात्र गतवर्षी पाऊस टप्प्याटप्प्याने पडल्याने खारभूमी शेतीतील पेरणी वाचली व पीक चांगले आले होते. यावर्षीचा जूनच्या प्रारंभी ११ जून रोजी एकदाच पडलेला मृग नक्षत्रातील पाऊस नंतर १३ दिवस दांडी मारून हजर झाला. खारभूमी क्षेत्रातील केलेली भात पेरणी भिजून नंतर पावसाचा शिडकावा न झाल्याने भात बियाणाचे अंकुर फुटले नसून या बियाणाला बुरशीची लागण होवून संपूर्ण केलेला पेरा वाया गेला. चांगल्या प्रतवारी असलेल्या जमिनीत भाताचे नर्सरी रोपे चांगली बहरली दिसत असताना, खारभूमी क्षेत्रातील शिवारात ओसाड परिस्थिती दिसत होती. याबाबत शेतकरीवर्गाने तालुका कृषी विभागाकडे या बाबतीत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लक्ष वेधले असता तालुका कृषी कार्यालयाचे पथकाने या क्षेत्राची पाहणी केली. ९३ गावातील पाहणी करून ९०० हेक्टर खारभूमी क्षेत्रातील धूळ पेरणी वाया गेल्याचा अहवाल शासनास सादर केला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेण तालुक्यातील एकूण १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ८०० हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट असून यामध्ये ९ हजार १७६ हेक्टर क्षेत्राचा समावेश खारभूमी क्षेत्रात होतो. यामधील ८ हजार ९९७ हेक्टर क्षेत्राची पाहणी तालुका कृषी विभागाने करून भात बियाणे पेरणी नष्ट झाल्याचा अहवाल ठाणे विभागीय कृषी संचालक यांना ठाणे येथील बैठकीत सादर केला आहे.
यावर्षीचा पाऊस चांगला होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खरेदी करून धूळ पेरणी केली होती. आर्द्रा नक्षत्राचा पाऊस चांगला पडत असल्याचे डोळ्यादेखत दिसत असतानाच खारभूमी क्षेत्रातील ९०० हेक्टरवर असा दुबार पेरणीसाठी बियाणांची शोध मोहिमेची लगबग सुरु आहे. शासनाने यासाठी तातडीची प्रासंगिक मदत म्हणून बियाणे व खते उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांनी शासन दरबारी मागणी आहे. (वार्ताहर)
> तालुका कृषी विभागाचा अहवाल सादर
तालुका कृषी कार्यालयाचे पथकाने या क्षेत्राची पाहणी केली. ९३ गावातील पाहणी करून ९०० हेक्टर खारभूमी क्षेत्रातील धूळ पेरणी वाया गेल्याचा अहवाल शासनास सादर केला आहे. तालुका कृषी विभागाने भात बियाणे पेरणी नष्ट झाल्याचा अहवाल दिला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पेण तालुक्यातील एकूण १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ८०० हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट असून यामध्ये ९ हजार १७६ हेक्टर क्षेत्राचा समावेश खारभूमी क्षेत्रात होतो. त्यापैकी ८ हजार ९९७ हेक्टर क्षेत्राची पाहणी के ली.

Web Title: Due to the sowing of farmers of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.