तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे पुन्हा ठप्प

By admin | Published: February 9, 2016 09:44 AM2016-02-09T09:44:16+5:302016-02-09T09:47:07+5:30

सानपाडा- वाशी स्थाकांदरम्यान रुळाला तडे गेल्याने मंगळवारी सकाळी हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली

Due to technical difficulties, Harbor rail again jumped | तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे पुन्हा ठप्प

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे पुन्हा ठप्प

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ९ - सानपाडा स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हार्बर रेल्वे ठप्प होण्याच्या सततच्या घटनामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. मंगळवारी सकाळी सानपाडा- वाशी स्थाकांदरम्यान रुळाला तडे गेल्याने ही वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सध्या लोकल्स फक्त वाशी ते सीएसटी स्थानकांदरम्यानच धावत आहेत. तसेच पनवेलहून सीएसटीकडे जाणा-या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याचे समजते. ऐन गर्दीच्यावेळी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

गेल्या आठवड्यातही वडाळा-शिवडी दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने सीएसटीच्या दिशेने येणारी हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. 

 

Web Title: Due to technical difficulties, Harbor rail again jumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.