दूरदर्शनमुळेच आम्ही घडलो

By Admin | Published: May 13, 2016 04:02 AM2016-05-13T04:02:50+5:302016-05-13T04:02:50+5:30

दूरदर्शन वाहिनी नसती तर हा प्रवास अधिक खडतर झाला असता, अशी कृतज्ञ भावना प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे

Due to television, we have done this | दूरदर्शनमुळेच आम्ही घडलो

दूरदर्शनमुळेच आम्ही घडलो

googlenewsNext

मुंबई : आम्हाला घडविण्यात दूरदर्शन वाहिनीचे सर्वांत मोठे योगदान आहे. दूरदर्शन वाहिनी नसती तर हा प्रवास अधिक खडतर झाला असता, अशी कृतज्ञ भावना प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे देण्यात येणारा ‘सह्याद्री संगीतरत्न’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.
‘सह्याद्री नवरत्न’ पुरस्कार सोहळा गुरुवारी रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. या सोहळ््यात विविध क्षेत्रांतील दहा व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. विजया राजाध्यक्ष (साहित्यरत्न), गायक पं. रामदास कामत (नाट्यरत्न), ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर (रत्नदर्पण), जैन इरिगेशनचे अध्यक्ष अनिल जैन (रत्नवैभव (उद्योग), डॉ. विजया वाड (शिक्षणरत्न), ‘आपलं घर’चे विजय फळणीकर (सेवारत्न), सुलेखनकार अच्युत पालव (कलारत्न) व संगीतकार अजय - अतुल (संगीतरत्न) यांना नवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच, उदयोन्मुख अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांना ‘फेस आॅफ द इअर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना चित्ररत्न पुरस्कार जाहीर झाला होता. पण ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत.
नवरत्न पुरस्कार सोहळ््यासाठी ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते विक्रम गोखले, उद्योजक विजय कलंत्री, लेखिका गिरीजा काटदरे या मान्यवरांनी परिक्षकांची भूमिका बजावली. या कार्यक्रमाला मुंबई दूरदर्शन अतिरिक्त महानिदेशक मुकेश शर्मा, प्रसार भारतीचे सदस्य अनुप जलोटा व सुनील अलग, अभिनेत्री जुही चावला यांसह अनेक रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
> येत्या काही वर्षांत भारत जगातील सर्वात युवा देश म्हणून ओळखला जाणार आहे. यासाठी दूरदर्शनने ‘युवारत्न’ पुरस्कार सुरू करून युवा वैज्ञानिक, युवा संशोधक, युवा उद्योजक, युवा संगीतकार यांनाही सन्मानित करावे, अशी अपेक्षा राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, राज्यातील माती कसदार व सुपीक असून येथील कष्टाळू लोक तिची नियमितपणे मशागत करतात, असे चीनी प्रवासी युवान सांग याने सातव्या शतकात लिहून ठेवले होते.

Web Title: Due to television, we have done this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.