पालिका रक्तपेढ्यांची मान्यता धोक्यात

By admin | Published: August 16, 2016 07:39 PM2016-08-16T19:39:04+5:302016-08-16T19:39:04+5:30

रक्तपेढ्यांची मान्यताच अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द होण्याचा धोका असल्याने अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली

Due to the threat of municipal blood banks | पालिका रक्तपेढ्यांची मान्यता धोक्यात

पालिका रक्तपेढ्यांची मान्यता धोक्यात

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - नवीन मोबाईल ब्लड बँक व्हॅनची खरेदी न केल्यास रक्तपेढ्यांची मान्यताच अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द होण्याचा धोका असल्याने अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. त्यानुसार अशा चार व्हॅन तातडीने खरेदी करण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू आहे. रुग्णालयांमार्फत विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदात्यांकडून प्राप्त झालेले रक्त रक्तपेढीमध्ये जमा करण्यात येत असते. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या ब्लॅड बँक व्हॅनची मुदत ३१ मे २०१५ रोजी संपुष्टात आली आहे. उच्च न्यायालयाने यास मुदतवाढ देऊन ३१ डिसेंबरपर्यंत २०१५ पर्यंतची वेळ दिली होती. मात्र ही मुदत संपून नऊ महिने उलटले तरी ब्लड व्हॅन खरेदीबाबत पालिका सुस्त होती. अखेर अन्न व औषध प्रशासनाकडूनच दंडुका पडल्यानंतर पालिकेची झोप उडाली आहे. मोबाईल ब्लड बँक व्हॅन खरेदी न केल्यास रक्तपेढ्यांची मान्यताच रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रक्तपेढ्यांची मान्यता रद्द होणे ही बाब पालिकेसाठी शरमेची ठरणार असल्याने या व्हॅनच्या खरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावार तात्काळ मंजुरीसाठी आला आहे. मोबाईल ब्लड बँक व्हॅन म्हणजे काय पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपर्यंत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या ठिकाणी एकत्रित केलेले रक्तदात्यांचे रक्त सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाईल ब्लड बँक व्हॅन ही संकल्पना आली. या व्हॅनद्वारे हे रक्त तात्काळ रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांमध्ये जमा केले जाते. चार व्हॅनची आवश्यकता परळ येथील केईएम, मुंबई सेंट्रलचे नायर रुग्णालय आणि सायन येथील लोकमान्य टिळक व घाटकोपरचे राजावाडी अशा चार रुग्णालयांसाठी प्रत्येकी एक ब्लड बँक व्हॅन खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी १६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Web Title: Due to the threat of municipal blood banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.