दोन घारींमुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाच्या हवेत घिरटय़ा
By admin | Published: August 10, 2014 02:24 AM2014-08-10T02:24:12+5:302014-08-10T02:24:12+5:30
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी दुपारी क:हाड दौ:यावर आले असताना धावपट्टीवर असलेल्या दोन घारींमुळे त्यांच्या विमानाचे ‘लँडिंग’ खोळंबल़े
Next
>क:हाड (जि़ सातारा) : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी दुपारी क:हाड दौ:यावर आले असताना धावपट्टीवर असलेल्या दोन घारींमुळे त्यांच्या विमानाचे ‘लँडिंग’ खोळंबल़े धावपट्टीवर उतरण्यासाठी आलेले विमान पुन्हा हवेत ‘टेक-ऑफ’ झाल़े तोर्पयत पोलिसांनी सायरनच्या गाडय़ा धावपट्टीवर फिरवूून घारींना हटवल़े दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विमानाने क:हाडभोवती दोन घिरटय़ा घातल्या आणि पाच मिनिटांनंतर विमान सुखरूप उतरल़े
पूर्वनियोजित दौ:यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सव्वादोन वाजता क:हाड विमानतळावर पोहोचणार होते; पण 3 वाजता त्यांचे विमान विमानतळानजीक पोहोचले. विमानतळावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, सुरेंद्र गुदगे यांच्यासह सर्व कार्यकर्ते, शासकीय अधिकारी स्वागताच्या तयारीत होते. विमान धावपट्टीवर उतरणार तोच वैमानिकाला घारी दिसल्याने त्याने विमान पुन्हा हवेत उंच घेतल़े विमानतळाच्या अधिका:यांना ही माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना सांगून दोन पोलीस व्हॅन सायरन वाजवत धावपट्टीवर फिरवल्या आणि पाच मिनिटांनी विमान सुखरूप उतरल़े
दुस:यांदा घडला प्रकार
गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण क:हाड दौ:यावर आले होत़े त्यावेळीही विमानतळाच्या धावपट्टीवरील घारींनी पोलिसांना जेरीस आणले होत़े सुमारे पंधरा मिनिटे सायरन वाजवत पोलीसगाडय़ा धावपट्टीवर धावत होत्या़ आजतर विमान धावपट्टीच्या दिशेने येत असताना जमिनीला त्याची चाकं टेकणार तोवर पुढे घारी दिसल्याने वैमानिकाने पुन्हा विमान हवेत नेल़े