विदर्भावरील अवकाळी पावसाचे सावट कायम
By admin | Published: January 5, 2015 04:33 AM2015-01-05T04:33:53+5:302015-01-05T04:33:53+5:30
विदर्भावरील अवकाळी पावसाचे सावट रविवारी देखील कायम होते. सायंकाळी साडेपाचपर्यंत चंद्रपूरमध्ये ५ मिमी तर ब्रम्हपुरीमध्ये २ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली
पुणे : विदर्भावरील अवकाळी पावसाचे सावट रविवारी देखील कायम होते. सायंकाळी साडेपाचपर्यंत चंद्रपूरमध्ये ५ मिमी तर ब्रम्हपुरीमध्ये २ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे राज्याचे तापमान रविवारीही चढेच होते.
राज्यात रविवारी सर्वात कमी ११.४ अंश सेल्सिअस तापमान जळगावमध्ये नोंदविले गेले. त्या पाठोपाठ पुण्याचे तापमान १२.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. विदर्भ आणि मराठवाड्याने गेल्या आठवड्यात थंडीची लाट आणि या आठवड्यात सर्वाधिक तापमानाचा आणि अवकाळी पावसाचा सामना केला. रविवारीही विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांनी वाढलेलेच होते. पुढील ४८ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.