वजनदार खात्यांच्या आग्रहामुळे खातेवाटपाचे गुऱ्हाळ सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:52 AM2020-01-02T02:52:24+5:302020-01-02T06:50:38+5:30

मंत्र्यांमध्ये रस्सीखेच; आणखी एक-दोन दिवस लागणार

Due to the urge of weighty accounts, the caveat for account sharing is on the way! | वजनदार खात्यांच्या आग्रहामुळे खातेवाटपाचे गुऱ्हाळ सुरूच!

वजनदार खात्यांच्या आग्रहामुळे खातेवाटपाचे गुऱ्हाळ सुरूच!

Next

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी खातेवाटपाचे गुºहाळ अद्याप सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. खातेवाटपावर सर्वमान्य तोडगा निघण्यासाठी आणखी एक-दोन दिवस जाण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन तीन दिवस झाले तरी खातेवाटप झालेले नाही. ज्येष्ठ नेतेच ‘वजनदार’ खात्यासाठी आडून बसले आहेत. खाते वाटपास होत असलेल्या विलंबाबद्दल आघाडीतील आमदारच आता नाराजी व्यक्त करत आहेत. शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे आलेले सरकार ज्येष्ठ नेत्यांच्या हट्टापायी अडणार असेल, तर अशा नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवा अशीही प्रतिक्रिया उमटत आहे.

गृह, जलसंपदा, कामगार, सामाजिक न्याय या खात्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्यावरुन काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे विलंब होत असल्याचे वृत्त आहे. बुधवारी या संदर्भात झालेल्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, खाते वाटपावरून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. बैठकीत आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. पालकमंत्री, दालन आणि निवासस्थांनाचे वाटप झालेले आहे. एकदोन दिवसात खाते वाटप होईल, असेही पवार यांनी सांगितले. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कोणत्याही आघाडी सरकारमध्ये खाते वाटपास थोडा विलंब होतच असतो.

आदित्यच्या दालनास उद्धव यांची भेट
शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. त्यांचे दालन सातव्या मजल्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळे राजशिष्ठाचार बाजूला ठेवून सातव्या मजल्यावरील आपल्या मुलाचे दालन कौतुकाने पाहात काही सूचनाही केल्या.

Web Title: Due to the urge of weighty accounts, the caveat for account sharing is on the way!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.