‘झेडपी’च्या चाव्या चोरांच्या हातात नकोत, मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 07:55 PM2017-02-16T19:55:21+5:302017-02-16T19:55:21+5:30

विकासाचा पैसा योग्य मार्गाने खर्च व्हायचा असेल तर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या चोरांच्या हातात देवू नका

Due to the Zappa's cheating thieves, Chief Minister's collision in Kolhapur | ‘झेडपी’च्या चाव्या चोरांच्या हातात नकोत, मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात घणाघात

‘झेडपी’च्या चाव्या चोरांच्या हातात नकोत, मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात घणाघात

Next

ऑनलाइन लोकमत
 कोल्हापूर, दि. 16 -  विकासाचा पैसा योग्य मार्गाने खर्च व्हायचा असेल तर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या चोरांच्या हातात देवू नका असा घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोरोची (ता. हातकणंगले) येथील जाहीर सभेत केली. कोल्हापूर जिल्हयात आता परिवर्तन अटळ आहे. कोणत्याही स्थितीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांची बँक दिवाळखोरीत निघाली आहे त्यामुळे त्यामध्ये पुन्हा तुमच्या मतांचे डिपॉझिट ठेवू नका नाहीतर मुद्दलही परत मिळणार नाही अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. भाजप,जनसुराज्य, ताराराणी आघाडी व युवक क्रांती आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची ही सभा झाली. त्यास रणरणत्या उन्हांतही लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, शाहू गु्रपचे समरजित घाटगे, बाबा देसाई, रजनीताई मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वाभिमानी’ बेदखल
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व भाजपच्या संबंधांमध्ये गेल्या कांही दिवसांपासून कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या सभेत संघटनेबध्दल मुख्यमंत्री किंवा अन्य कोण कांही बोलते का याबध्दल उत्सुकता होती परंतू मुख्यमंत्र्यांसह कुणीच संघटनेबध्दल अवाक्षरही बोलले नाही.

  ‘एफआरपी‘ आमच्यामुळेच  उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त ५० टक्केच एफआरपी मिळाली आहे परंतू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ९८ टक्के एफआरपी मिळवून देण्यात राज्य सरकार यशस्वी झाले आहे व एवढी एफआरपी देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सदाभाऊंची दांडी
सांगलीतील सभेला कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत गळ््यात भाजपचे उपरणे घालून व्यासपीठावर उपस्थित होते परंतू या सभेला मात्र सदाभाऊ आले नाहीत. त्यामुळे उपस्थितीत लोकांतही त्याची चर्चा झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते परंतू वेळेअभावी ते सभेत बोलले नाहीत. पालकमंत्री असल्याने त्यांनी किमान पाच मिनिटे तरी बोलायला हवे होते अशीही चर्चा यावेळी झाली.

भाषण नव्हे जीआर वाचन
मुख्यमंत्री दूपारी साडेतीन वाजता बोलायला उभे राहिले. त्यांनी अर्धा तासात दोन वेळा पाणी पिवून खणखणीत आवाजात भाषण केले परंतू त्यातील २० ते २२ मिनिटे त्यांनी सरकारची कामगिरी सांगण्याच्या ओघात जीआरचेच वाचन केल्यासारखे भाषण केले. 

Web Title: Due to the Zappa's cheating thieves, Chief Minister's collision in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.