दुहेरीकरणाचा प्रस्ताव मंजूर?
By admin | Published: July 11, 2015 02:28 AM2015-07-11T02:28:44+5:302015-07-11T02:28:44+5:30
कोकण रेल्वेवर दुहेरी मार्गाचा प्रस्ताव कोकण रेल्वेकडून तयार करण्यात आला असून, तो रेल्वे बोर्डाकडे नुकताच मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून
मुंंबई : कोकण रेल्वेवर दुहेरी मार्गाचा प्रस्ताव कोकण रेल्वेकडून तयार करण्यात आला असून, तो रेल्वे बोर्डाकडे नुकताच मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्याचे सूत्रांकडून सांगितले.
कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे कोकण रेल्वेकडून काही महिन्यांपूर्वी पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात आहे. तसेच अलिबाग येथील एका कार्यक्रमादरम्यानही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दुहेरीकरणाला मंजुरी दिल्याचे जाहीर केले होते. याबाबत कोकण रेल्वेचे महाप्रबंधक (प्रशासन) सिद्धेश्वर तेलगु यांना विचारले असता, दुहेरीकरणाला त्यांनी दुजोरा दिला. मात्र अद्याप या मंजुरीची
प्रत रेल्वे मंत्रालयाकडून कोकण
रेल्वे प्रशासनाला मिळालेली नाही. मध्य रेल्वेकडून दुहेरीकरणासाठी
पेण ते रोह्यापर्यंतचे काम हाती घेण्यात आले आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत
आहेत. (प्रतिनिधी)