दारूविरुद्ध संत्रीबाईचा दुर्गावतार

By admin | Published: September 28, 2014 01:55 AM2014-09-28T01:55:03+5:302014-09-28T01:55:03+5:30

गावात दारूबंदी होईल, असे कुणालाही स्वप्नात वाटले नाही. मात्र याच गावातील संत्रीबाई विश्वनाथ राठोड या महिलेने दुर्गावतार धारण करीत दारूबंदी केली.

Durgavtar of Sandhya against alcohol | दारूविरुद्ध संत्रीबाईचा दुर्गावतार

दारूविरुद्ध संत्रीबाईचा दुर्गावतार

Next
>ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ
तिवसा हे बाराशे उंबरठय़ाचे गाव. पंचक्रोशीतील गावांसाठी दारूचे मार्केट. एक घर सोडून दारूची निर्मिती व विक्री होणा:या या गावात दारूबंदी होईल, असे कुणालाही स्वप्नात वाटले नाही. मात्र याच गावातील संत्रीबाई विश्वनाथ राठोड या महिलेने दुर्गावतार धारण करीत दारूबंदी केली. 
यवतमाळ तालुक्यातील तिवसा हे गाव हातभट्टीच्या दारूसाठी प्रसिद्ध होते. येथील बहुतांश कुटुंबांचा दारू गाळणो आणि विकणो हा व्यवसाय होता. गावात शंभर हातभट्टय़ा होत्या.  दारुडय़ांचा सर्वाधिक त्रस महिलांना सहन करावा लागत होता. दररोजची भांडणो, त्यातून पोलिसांर्पयत गेलेली प्रकरणो यामुळे गावाचा विकासही खुंटला होता. एव्हढेच नाही, तर अनेकांना दारूमुळे अनेकांचा  मृत्यू झाला. गावातील एका राठोड परिवारातील तर सर्व पुरुष मंडळी अतिमद्य सेवनाने मृत्युमुखी पडली. आता या घरात केवळ महिलाच राहिल्या. अशीच अवस्था अनेक कुटुंबांची झाली होती. परंतु कुणीही दारू विकणो आणि पिणोही थांबवत नव्हते. कारण गावात दारू विकणा:यांचे वर्चस्व होते.  कुणी पोलिसात तक्रार केली तर दारूविक्रेते त्याला सळो की पळो करून गावात जगणो मुश्कील करीत होते. अशा या गावात दारूबंदी होईल असे कुणालाही स्वप्नात वाटले नाही. मात्र एका महिलेने दुर्गावतार धारण केला आणि गावात कायमची दारूबंदी झाली. 
संत्रीबाई विश्वनाथ राठोड असे या महिलेचे नाव आहे. तिसरी शिकलेल्या या महिलेचे माहेर तिवसाच आहे. 3क् वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील दहेली तांडा येथील विश्वनाथ राठोडसोबत तिचा विवाह झाला. मात्र दोनच महिन्यांत पतीचे निधन झाले. ती भाऊ धनराज जाधव, मुलचंद जाधव यांच्या आश्रयाने पुन्हा तिवसातच आली. गावात दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार जवळून पाहत होती. घरासमोर पडून असणारे दारुडे, त्यांची शिवीगाळ नेहमी कानावर पडायची. तिने गावात दारूबंदीचा विडा उचलला. गावातील 12 महिला बचत गट एकत्र आणले. गावात जगदंबा बचत गटाची स्थापना केली. त्यांच्या सोबतीला मुक्ता चव्हाण, कौशल्या मोहन राठोड, सुरेखा राठोड, लक्ष्मी राठोड, नंदा कुमरे, प्रीती चव्हाण, उषा सुलकर यांच्यासह शंभरावर महिला आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि दारूबंदी विभागाला निवेदन दिले.   गावक:यांनी टिंगल-टवाळी करीत या महिला काय दारूबंदी करू शकतात, असे टोमणो मारले. मात्र या महिला आपल्या निर्धारावर कायम होत्या. गावातील दारूविक्रेत्यांना त्यांनी समजावून सांगितले. परंतु कुणीही ऐकत नव्हते. त्यामुळे गावालगतच्या जंगलात सुरू असलेल्या हातभट्टय़ांवर या महिला धाडी मारू लागल्या. परंतु त्याचा अपेक्षित परिणाम होत नव्हता. 
शेवटी गावातील सर्व महिला एकत्र आल्या आणि 27 जुलै 2क्13 रोजी दुर्गावतार धारण केला. गावातील शंभर हातभट्टय़ा उद्ध्वस्त केल्या. 1 ट्रॅक्टर मोहाची दारू, 5क्क् पिंप आणि 5क् मोठय़ा टाक्या दारू जप्त केली. महिलांना प्रचंड विरोध झाला. परंतु त्यांनी कुणालाही जुमानले नाही. सरळ ट्रॅक्टरभर दारू घेऊन यवतमाळचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले.  परिणाम व्हायचा तोच झाला. गावातून दारू हद्दपार झाली ती कायमची. आता वर्षभरानंतरही या गावात दारूचा थेंब मिळत नाही. काही सवयीचे गुलाम दारुडे बाहेरगावी जाऊन दारू पितात, परंतु तेही चूपचाप. 
त्या आंदोलनाबद्दल संत्रीबाई राठोड सांगतात, आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाचे नव्हते. दारूमुळे त्रस्त झालेल्या आम्ही महिला एकत्र आलो आणि आमची शक्ती दाखवून दिली. यासाठी सरपंच उदयसिंग राठोड, उपसरपंच शंकर पवार आणि अधिकारी, कर्मचा:यांनीही आम्हाला सहकार्य केले. आज शेकडो महिलांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत. दारूबंदी झाली त्या काळात दोन महिने तर झोप येत नव्हती. दररोज दारुडय़ांकडून धमक्या येत होत्या. आमच्याबद्दल गैरसमज पसरविले जात होते. परंतु तिवसा हे माङो जन्मभूमीचे गाव आहे आणि ते दारूमुक्त केले याचा मला अभिमान आहे. या आंदोलनासाठी लाडखेडचे तत्कालीन ठाणोदार संजय शिरभाते यांना महिलांनी विनवणी केली होती. परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. या आंदोलनानंतर त्यांना निलंबित केले. 
 
दारूबंदी करणा:या महिलेवर विळ्याचे 11 वार 
संत्रीबाईच्या टीममधील शोभा राठोड या महिलेवर दारूबंदीनंतर 5 महिन्यांनी दारूविक्रेत्याने हल्ला केला. एक-दोन नव्हेतर विळ्याचे तब्बल 11 वार केले. रक्तबंबाळ शोभाबाईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी हल्ला करणा:या गोपाळ राठोडला महिलांनी चांगलेच बदडून पोलिसांच्या हवाली केले. दुर्गादेवीची कृपा म्हणून आमची सहकारी बचावली, असे संत्रीबाई सांगते. 
 
आज या महिलांची दारुडय़ांत एवढी दहशत आहे की कुणी दारू गाळायचे तर सोडा पिण्याचाही विचार करीत नाही. संत्रीबाईचा हा आदर्श इतर गावांतील महिलांनीही घेतला असून, परिसरातील सहा ते सात गावांत दारूबंदी झाली. तिवसा येथे तर विशेष कार्यक्रमात न्यायाधीश एस.एम. आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Web Title: Durgavtar of Sandhya against alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.